जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या

गोल्डी शंभरकर आणि चार आरोपी हे मित्र होते, मात्र सकाळीच यांच्यामध्ये जुन्या वादावरुन भांडणं झाली. त्यानंतर गोल्डीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या
नागपुरात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 3:06 PM

नागपूर : नागपूरचा दिवस आज हत्येच्या घटनेने उजाडला, पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोल्डी शंभरकर नावाच्या युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. आपसातील जुन्या वादामुळे ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या पाचपावली परिसरात सकाळच्या वेळी घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मृत गोल्डी शंभरकर आणि चार आरोपी हे मित्र होते, मात्र सकाळीच यांच्यामध्ये जुन्या वादावरुन भांडणं झाली. त्यानंतर गोल्डीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

मृत आणि आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे

मृत आणि आरोपी हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. 2018 मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या हत्येचं नेमकं कारण काय आणि कशावरुन त्यांच्यात वाद झाला हे आरोपींच्या अटकेनंतर स्पष्ट होईल. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत चार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये सतत हत्यासत्र सुरू असून यामुळे नागपुरात चांगलीच खळबळ माजली आहे. क्षुल्लक कारण असलं तरी भरदिवसा झालेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या :

ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं

सुनेला भाडेकरुसोबत विचित्र परिस्थित बघितलं, संतापाचा पारा चढला, सासऱ्याने मध्यरात्री पाच जणांना संपवलं, हत्येचा भयानक थरार

सामसूम रस्ता बघून महिलेला हेरलं, गाडी थांबवली, चाकू दाखवत दमदाटी, दागिने हिसकावले, पोलिसांनी आरोपीला बरोबर घेरलं

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.