नागपूर : युवतीला बंदुकीचा धाक दाखवत फ्लॅटमध्ये दरोडा (Robbery) टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील गजबजलेल्या परिसरात (Nagpur) भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. फ्लॅटला कुलूप लावलेलं असल्याचं पाहून दोघे जण घरात शिरले होते. घर बंद असल्यामुळे आत कुणीच नसेल, असा दोघांचा कयास होता, मात्र कुलूपबंद फ्लॅटमध्ये अचानक 23 वर्षीय युवती असल्याचं दिसून आल्याने दोघेही चपापले. त्यांनी तिच्यावर बंदूक ताणली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत दोघा दरोडेखोरांनी तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीतील उज्ज्वला अपार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींचे स्केच बनवून त्यांचा शोध सुरु केला आहे.
दोन्ही आरोपींनी अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. नागपुरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेल्या बजाज नगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीतील उज्ज्वला अपार्टमेंटमध्ये भर दुपारी फ्लॅटला कुलूप लागलेलं असल्याचं बघून दोन आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवला. मात्र फ्लॅटमध्ये 23 वर्षीय युवती असल्याचं त्यांना दिसून आल्याने आरोपींनी तिच्यावर बंदूक ताणली. घरातील लॉकरच्या चाव्या घेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. पोलिसांनी आता आरोपींचं स्केच बनवून त्यांचा शोध सुरू केला.
युवती घरात आराम करत होती, आईला बाहेर जायचं असल्याने तिने घराला बाहेरुन कुलूप लावलं. आरोपींनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत प्रवेश केला, मात्र घरात युवती असल्याने त्यांचा गोंधळ उडाला आणि चक्क तिच्यावर बंदूक ताणत चोरी करुन ते पसार झाले. मात्र भर दिवसा झालेल्या या दरोड्याचा घटनेने परिसरात खळबळ माजली असून सोबतच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
संबंधित बातम्या :
अखेर छडा लागला, 61 लाखांच्या मोबाईल चोरीमागे बंगाली टोळी; तिघांना बेड्या, 3 जण फरार
फक्त मोबाईल चोरीसाठी नागपूर-सोलापूर प्रवास, परराज्यातील टोळीचा पर्दाफाश, 11 जणांना बेड्या
कुरिअर देण्याच्या बहाण्याने रेकी, बँक अधिकाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा, उच्चशिक्षित चोरटे जेरबंद