रेमडेसिव्हीर काळा बाजार, सापळा रचून पकडलेल्या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
रेमडेसिव्हीर काळा बाजार प्रकरणात सरकारचे सगळे साक्षीदार तपासून आणि उभय पक्षांची बाजू ऐकून गुरुवार 26 ऑगस्ट रोजी गोंदियाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
गोंदिया : रेमडेसिव्हीर काळा बाजार प्रकरणात (Remdesivir Injection Black Market) सहा आरोपींची जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी निर्दोष मुक्तता केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून सहा जणांनी अटक केली होती.
काय आहे प्रकरण?
स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि मिथाईल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शनच्या काळा बाजार प्रकरणात आरोपी अमोल चौधरी याला पकडले होते. त्याची चौकशी केली असता त्याने आणखी काही नावं सांगितली. त्यानुसार तिघांनाही 4 मे रोजी अटक करण्यात आली होती.
आरोपींची निर्दोष मुक्तता
या तिन्ही आरोपींना 5 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी पोलिसांनी अरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्याच दिवशी मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया यानी आरोपींनी दोषारोप फेटाळल्याने 4 ऑगस्ट रोजी साक्षी पुराव्यासाठी हा खटला न्यायालयात ठेवण्यात आला.
याच दिवशी सरकारच्या बाजूने आरोपींविरुद्ध सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारचे सगळे साक्षीदार तपासून आणि उभय पक्षांची बाजू ऐकून गुरुवार 26 ऑगस्ट रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
नागपुरात महाराष्ट्रातील पहिली ‘रेमडेसिव्हीर’ शिक्षा
दरम्यान, रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात जुलै महिन्यात महाराष्ट्रातील पहिली शिक्षा सुनावण्यात आली होती. आरोपी वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा विशेष न्यायालयाने ठोठावली होती. नागपुरात एप्रिल 2021 मध्ये महेंद्र रंगारी कोरोनाग्रस्त रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरून विकल्याचा आरोप होता.
संबंधित बातम्या :
रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास
मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक