लैंगिक शोषण करुन पीडितेचा गर्भपात, अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला अटक
अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
वर्धा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन गर्भपात केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा 30 हजार रुपयांत अवैधरित्या गर्भपात (Abortion) केल्याचा आरोप आहे. वर्धा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह डॉ. रेखा कदम यांना आर्वी पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता मुलाच्या आई व वडिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली, तर डॉ. रेखा कदम यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांच्यासह दोघा जणांना अटक केली होती. मंगळवारी पुन्हा न्यायालयात तिघांना हजर केले असता दोघांना कारागृहात तर डॉ. कदम यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली. पोलीस चौकशीत आणखी काही बाबी पुढे येणार असल्याचे संकेत आर्वी पोलिसांनी दिले आहेत.
आणखीही प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता
डॉ. रेखा कदम यांनी अवैधरित्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचे उघड होताच आर्वी शहरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील डॉ. कदम यांनी असे प्रकार केल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास आणखी काही प्रकरणं पुढे येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या :
नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात, औरंगाबादेत 25 वर्षीय डॉक्टरसह चौघांवर गुन्हा
Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप
मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या