पाणी भरताना हात धरला, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, साडेपाच वर्षांनी आरोपीला शिक्षा
23 नोव्हेंबर 2016 रोजी अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणावर आहे. पीडिता ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अजय दीपक बावणे हा तिथे गेला आणि त्याने पीडितेचा हात पकडला
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molestation) केल्या प्रकरणी आरोपीला जवळपास साडेपाच वर्षांच्या कालावधीनंतर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश 1 व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. वर्ध्यात (Wardha Crime News) नोव्हेंबर 2016 मध्ये ही घटना घडली होती. अजय दीपक बावणे, रा. सोनोरा (ढोक), ता. देवळी, जि. वर्धा असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला कलम 7 आणि 8 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड 2 हजार रुपये अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
23 नोव्हेंबर 2016 रोजी अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणावर आहे. पीडिता ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अजय दीपक बावणे हा तिथे गेला आणि त्याने पीडितेचा हात पकडला. त्यामुळे पीडिता घाबरली. तिने झटका देऊन तिचा हात सोडवला आणि घरात धावत गेली.
नेमकं काय घडलं?
त्यानंतर अजय हा पीडितेच्या मागे घरात आला आणि त्याने पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडितेने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी तिथून पळून गेला होता.
या प्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणी सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले.
काय आहे शिक्षा?
आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश 1 व्ही. टी. सूर्यवंशी यांनी निकाल दिला. आरोपीला कलम 7 आणि 8 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.