आईने लग्नास विरोध केला म्हणून तिलाच संपवलं, त्यानंतर भाचीचाही गळा आवळला; न्यायालयाने सुनावली ही शिक्षा
प्रल्हाद गुप्ता १० ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकृती बिघडल्याने घरी आला होता. तेव्हा त्याने आईशी लग्नावरून वाद घातला होता. तसेच घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती.
चंद्रपूर : तो तरुण झाला. त्याला लग्न करायचं होतं. पण, आईने लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याचा पारा भडकला. त्याने आईचाच गळा दाबून खून केला. त्यानंतर तिथं असलेल्या तिच्या नातीला म्हणजे त्याच्या सात वर्षांचा भाजीलाही संपवलं. ही घटना घडली ऑक्टोबर २०१८ रोजी. प्रल्हाद गुप्ता (वय २१) असं या आरोपीचं नाव आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशातील शिंदुरिया इथला. घटना चंद्रपुरातील बालाजी वार्ड येथे घडली. प्रल्हादला एका मुलीशी लग्न करायचं होतं. तसा प्रस्ताव त्याने आईसमोर ठेवला. पण, माझं लग्न का करून देत नाही म्हणून प्रल्हादने आईला खून केला. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
जन्मठेपेची शिक्षा
प्रल्हादने त्याची आई आणि भाजी श्वेता (वय सात वर्षे) यांचा गळा दाबला. तक्रारीनंतर प्रल्हादविरोधात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात तपास झाला. आरोपीविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यात आले. एक मार्च रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. त्यानुसार, प्रल्हादला ३०२ कलमान्वये आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास तसेच पाच हजार रुये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे ए. एस. शेख आणि पैरवी म्हणून पोलीस हवालदार संतोष पवार यांनी काम पाहिले.
आई आणि भाजीला संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गुप्ता १० ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकृती बिघडल्याने घरी आला होता. तेव्हा त्याने आईशी लग्नावरून वाद घातला होता. तसेच घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१८ रोजी तो पुन्हा आला. आई सुशिला आणि श्वेता किरार या आजीनातीचा खून केला. अशी तक्रार लक्ष्मी पिंपळकर हिने नोंदवली. तसेच प्रल्हादने पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने घराला आग लावली. पण, पोलिसांनी योग्य असा तपास करून पुरावे शोधून काढले. त्यामुळे प्रल्हादला आता उरलेले आयुष्य जेलमध्ये काढावे लागणार आहे.