Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

नागपूरच्या रामदासपेठ भागातील कॅनल रोड इथं वाहतूक पोलीस कारवाई करत होते. त्यावेळी एका कारला थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. मात्र चालकांनं गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं
Nagpur traffic Police
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 6:51 PM

नागपूर : नागपुरात (Nagpur) एका कार (Car) चालकानं वाहतूक पोलिसाला (traffic police) चक्क गाडीवरुन ओढत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात (Camera) कैद झाली आहे. कार चालकावर कारवाई करत असताना बेशिस्त कार चालकानं वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. बोनेटवर बसलेल्या या पोलिसाला कार चालकानं वेगान फरफटत नेलंय. मात्र थोडक्यात वाहतूक पोलिसाचा यातून जीव वाचलाय. मात्र जिवाची पर्वा न करता कार चालकासमोर पोलिसानं दाखवलेल्या धाडसाचंही कौतुक केलं जातंय.

कारवाईदरम्यान काय घडलं?

नागपूरच्या रामदासपेठ भागातील कॅनल रोड इथं वाहतूक पोलीस कारवाई करत होते. त्यावेळी एका कारला थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. मात्र चालकांनं गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार चालकाला अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेव्हा पोलिसालाही न घाबरता कार चालकानं पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली.

पाहा नागपुरातील घटनेचा व्हिडीओ – 

यानंतर संतापलेल्या काही जागृक नागरिकांनी कारचा दुचाकीनं आणि कारनं पाठलाग गेला. त्यानंतर कार चालकाला गाडी थांबवणं भाग पाडलं. अखेरीस कार चालकाची गाडी थांबल्यानंतर वाहतूक पोलिसाला गाडीच्या खाली उतरवण्यात आलं. दोघांनी दुचाकीवरुन कारला ओव्हरटेक करत ब्लॉक केलं आणि पर्यायानं कार चालकांना गाडी थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. यानंतर कार चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईदेखील केली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी आता पुढील कारवाई करत आहेत.

मुंबईतही घडलेला असाच प्रकार!

दरम्यान, इकडे मुंबईतही वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून नेल्याप्रकऱणी कार चालकाला अटक करण्यात आली होती. ऑक्टेबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही घटना समोर आली होती. मुंबईत अंधेरीतील डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला होता. गाडी न थांबवल्याने वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर चढला. तरी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच फरफटत पुढे नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

पाहा मुंबईतील घटनेचा व्हिडीओ – 

इतर बातम्या – 

या गुन्हेगाराची भलतीच थिअरी, घरातच लपवायचा केलेली चोरी; 37 व्या वर्षात 37 गुन्हे असलेला चोर अखेर जेरबंद

शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.