Nagpur Accident : भाऊबीजेचा दिवस, मुलगा बाईकवर, आई डबलसीट, सुसाट वेगानं बस आली अन्…

दुर्दैवी! भाऊबीजेच्या दिवशी घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना, नेमका कशामुळे झाला अपघात?

Nagpur Accident : भाऊबीजेचा दिवस, मुलगा बाईकवर, आई डबलसीट, सुसाट वेगानं बस आली अन्...
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 10:56 AM

नागपूर : बुधवारी भाऊबीज एकीकडे उत्साहात साजरी केली जात होती. अशातच नागपूरमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नागपुरात (Nagpur News) बुधवारी दुपारी आई आणि तरुण मुलगा बाईकवरुन जात होती. यावेळी एका भरधाव बसने (Nagpur Bus And Bike Accident) दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत आईचा जागीच मृत्यू (Nagpur Accident News) झाला. तर मुलगी जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले होते. संतप्त जमावाने यावेळी बसवर दगडफेक केली आणि आपला राग व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. परिवर्तन चौकात घडलेल्या या घटनेनंतर एकच संपात व्यक्त करण्यात आला. स्टार बसच्या धडकेत दुचाकीवरुन खाली पडलेल्या महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. यावेळी रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.

पाहा लाईव्ह घडामोडी :

हे सुद्धा वाचा

डोळ्यांदेखत आईला गमावलं

मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सुषमा गजानन पाठक असं आहे. त्या 55 वर्षांच्या होत्या. आपल्या मुलासह त्या दुचाकीवरुन जात होत्या. या अपघातात त्यांचा मुलगा प्रतीक गजानन पाठक हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. मात्र आईचा डोळ्यांसमोर झालेला मृत्यू पाहून त्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी स्टार बसच्या चालकावर गुन्हा नोंदवून घेत त्याला अटक केलीय. एमएच 31 सीए 6224 या क्रमाकांची बस पाठक यांच्या एमएच 31 बीपी 6688 या दुचाकीला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यानंतर रस्त्यावरील नागरिकही संतापले होते.

लोकांनी केलेल्या दगडफेकीत बसचं नुकसान झालंय. लोकांनी दगडफेक केल्यामुळे या बसच्या काचा फुटल्या होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.