नागपुरात हत्या सत्र सुरुच, वर्चस्ववादातून चाकूने भोसकून गुंडाची हत्या
नागपुरात हत्या सत्र सुरुच आहे. काहीच दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका गुंडाचा खून झाला आहे. वर्चस्वच्या वादातून नागपुरात एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. चाकुने वार करत हत्या केल्याची माहिती आहे. नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन परिसरात ही हत्या झाली आहे.
नागपूर : नागपुरात हत्या सत्र सुरुच आहे. काहीच दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका गुंडाचा खून झाला आहे. वर्चस्वच्या वादातून नागपुरात एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. चाकुने वार करत हत्या केल्याची माहिती आहे. नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन परिसरात ही हत्या झाली आहे.
चेतन ठाकुर असं मृतकाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जुन्या वर्चस्वच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्रथमिक तपासात पुढे आलं आहे.
पुराव्याअभावी सुटलेल्या कुख्यात गुंडाची हत्या
नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात महिन्याभरापूर्वी कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली. हत्या करुन मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
2016 मधील एका हत्याकांडात पुराव्या अभावी गमछु नावाच्या गुंडाची निर्दोष मुक्तता झाली होती. गुंडाचा काही जणांशी वाद सुरु होता, त्यातून ही हत्या झाली असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात गमछूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरु करुन आरोपींचा शोध चालू केला आहे.
जेलमधून सुटलेल्या गुंडाची विटांनी हत्या
दरम्यान, एका कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी नागपूरच्या पांढरबोडी भागात घडली होती. अक्षय जयपुरेवर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तो सहा महिन्यांआधी जेलमधून बाहेर आला होता. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
नागपुरात गुंडाची दगडाने ठेचून हत्या
दुसरीकडे, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी नागपुरात समोर आली होती. मृत विजय विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो शहरातील शांती नगर भागातील आपल्या साथीदारांसोबत हप्ता वसुली करायचा. याविषयी अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त जमावाने त्याला जीवे मारलं
2016 मधील हत्याकांडातून पुराव्याअभावी सुटलेल्या गुंडाची नागपुरात हत्या https://t.co/p1cY2w0x1k #Maharashtra | #CrimeNews | #Murder | #Nagpur | #Goon | #Criminal
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
संबंधित बातम्या :
भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या