कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट

नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट
नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 3:58 PM

नागपूर : कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन तरुणाने आत्महत्या केल्या घटना काल नागपुरात उघडकीस आली होती. या प्रकरणात आता नवनवीन बाबी समोर येत आहेत. आरोपीने हत्येच्या आधी मेव्हणीवर अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तरुणीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. (Nagpur Man killed five family members allegedly molested sister in law before murder)

मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग?

नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र काही तासातच या प्रकरणात नवीन बाबी पुढे येताना दिसत आहेत. आरोपी आलोक माटूरकरने हत्या करण्यापूर्वी मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने तिचा गळा कापला असावा. भाऊजी घरात शिरताच काहीतरी करेल याचा अंदाज आल्याने मेहुणीने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केले होते. त्यात त्यांच्या संघर्षाचा आवाजही रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

हत्येचा कट आधीपासूनच रचला

इतकंच नाही तर आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचं पुढे आलं आहे. आरोपी हा महिलांना वश करण्याची विद्या घेत होता, असंही समोर येत आहे. मात्र त्याचा उपयोग त्याने यात केला की नाही याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी यातील अनेक घटनांना दुजोराही दिला मात्र तपास सुरू असल्याने त्यावर पोलीस विशेष बोलण्याचं टाळत आहेत.

नागपूरला हादरवणाऱ्या या घटनेचा तपास पोलीस सगळ्याच बाजूने करत आहेत. यात नेमकं काय झालं आणि कोणती अशी कारणं होती की सर्वसाधारण व्यक्तीने आपल्या जवळच्या पाच जणांची मोठ्या निर्दयतेने हत्या केली, आणि आत्महत्याही केली, याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. शव विच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

आधी पत्नी मुलांना संपवलं, मग सासू- मेहुणीची हत्या, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नागपूरच्या हत्याकांडाची ‘रिअल स्टोरी’

पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या! धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

(Nagpur Man killed five family members allegedly molested sister in law before murder)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.