मोठी बातमी ! नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात लष्कर ए तोयबाच्या पाशाचा हात; चौकशीसाठी नागपूर पोलीस बेळगावकडे

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेल्या धमकी प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. लष्कर ए तोएबाचा माजी सचिव यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोठी बातमी ! नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात लष्कर ए तोयबाच्या पाशाचा हात; चौकशीसाठी नागपूर पोलीस बेळगावकडे
नितीन गडकरी प्रकरणात लष्कर ए तोएबाच्या पाशाचा हातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 1:38 PM

नागपूर : नितीन गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. धमकी प्रकरणात लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशतवादी अफसर पाशाच्या अटकेसाठी नागपूर पोलीस बेळगावला रवाना झाले आहेत. पाशाला ताब्यात घेऊन पोलीस त्याची सखोल चौकशी करणार आहेत. जयेश पुजारीच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती पुढे समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात अफसर पाशाची जयेश पुजारीसोबत ओळख झाल्याची माहिती मिळते.

जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

आरोपी जयेश पुजारी जेलमधून लष्कर ए तोएबा आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांसाठी सदस्यांची नियुक्ती करायचा. जयेश पुजारीच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जयेश पुजारी हा कश्मीरी दहशतवादी अफसर पाशाच्या संपर्कात होता. पाशा हा ढाका आणि बंगळुरु येथील बॅाम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. पाशाने जयेश पुजारी याला बॅाम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्याची पीएफआयमध्ये नियुक्ती केली. UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

बेळगाव तुरुंगात जयेश पुजारी आणि अफसर पाशाची ओळख

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करणाऱ्या जयेश पुजारीचा माईंड वॉश करणाऱ्या दहशतवादी अफसर पाशाला नागपुरात आणणार आहे. नितीन गडकरी यांना फोन करून धमकी देण्यासाठी जयेश पुजारीला पाशाने प्रवृत्त केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. अफसर पाशा बेळगाव तुरुंगात असून, तुरुंगात पाशाचे जयेश पुजारीसोबत संबंध आले होते.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.