मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणींना देहव्यापारात ढकलले; आरोपीला ठोकल्या बेड्या…

मुलींना देह व्यवसाय करून घेणाऱ्या दलाला विक्की कदमवारला नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे.त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, तो एका मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडे तरुणी पाठवत होता.

मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणींना देहव्यापारात ढकलले; आरोपीला ठोकल्या बेड्या...
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:46 PM

नागपूरः मॉडलिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणींना देह व्यापाराच्या व्यवसायात ढकलून त्यांच्याकडू देहविक्री करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे नागपूरसह परिसरात मोठी खबळबळ उडाली आहे. या प्रकारात मुलींना जबरदस्तीने आणून देहव्यापार करायला लावणाऱ्या संशयिताला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात ज्या संशयित विक्की कदमवारला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली असून या प्रकरणात आणखी कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत.

मुलींना देह व्यवसाय करून घेणाऱ्या दलाला विक्की कदमवारला नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे.त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, तो एका मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडे तरुणी पाठवत होता.

त्याचा तपास आता पोलिसांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की कदमवार हा गेल्या अनेक वर्षापासून या देहाव्यापारात असल्याचे उघड झाले आहे.

विक्की कदमवार याने अनेक अल्पवयीन आणि शाळकरी मुलींना देह व्यापारात ढकलल्याचा तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी नागपुरातील ओयो हॉटेल्स आणि इतर नामांकित हॉटेल्समध्ये रूम बुक करून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना मुली पुरविण्याचे काम आरोपी करत होता. या प्रकरणी आता नागपूर पोलिसांनी एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मारून ही कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वीच नागपुमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला होता. त्यानंतर आता मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार करण्यात येत असल्याची घटना समोर आल्यानंतर आता नागपुरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

संशयित आरोपी दलाल विक्की राजू कदमवारने मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील एका तरुणीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून तिला नागपूरमध्ये घेऊन आला होता.

त्यानंतर त्याने आपली दिग्दर्शकांबरोबर ओळख असल्याचेही तिला सांगत होता. त्यानंतर शहरातील मनिषनगरमधील हॉटेल डेस्टिनीमध्ये तरुणीला ठेवून आरोपी तिच्याकडे शहरातील ग्राहकांना पाठवून देहव्यापार चालवत होता.

तरुणीचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो शूट करून आरोपी विक्कीनं त्यानंतर मुलीला ब्लॅकमेल करत होता. मात्र तरुणीनं बदनामीच्या भीतीमुळे या प्रकरणी कुणालाच सांगितले नाही.

याशिवाय आरोपी ग्राहकांकडून 10 हजार घ्यायचा आणि तरुणीला मात्र एक हजारच रुपये देत असल्याचे तपासात उघड झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.