नागपुरात देहविक्रीचा काळा धंदा उघड, तरुणींना विमानाने दिल्लीहून आणायचा, सात दिवस ठेवायचा आणि..
बंटी हा देहव्यापार चालवत असून याची माहिती बेलतरोडी पोलिसांना लागली होती. तो दिल्ली सारख्या शहरात असणाऱ्या मुलींना नागपूरात हॉटेलमध्ये ठेवायचा. तो मुलींचे फोटो आंबट शौकीन लोकांना व्हाटसअॅपवर पाठवत असे. पोलिसांनी या प्रकरणी धडाकेबाज कारवाई केली आहे.
नागपूर पोलिसांनी दिल्लीतील तरुणीकडून सुरू असलेला देहव्यापार उघडकीस आणत कारवाई केली आहे. दिल्लीतील उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणीकडून नागपुरात आणून देहव्यापार केला जात होता. बेलतरोडी पोलिसांनी नागपुरातील हॉटेलमध्ये फंटरच्या साहाय्याने हा प्रकार उघडकीस आणला आहे. बंटी उर्फ बिलाल अहमद अली आणि विशाल नामक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आला. आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे.
बंटी हा देहव्यापार चालवत असून याची माहिती बेलतरोडी पोलिसांना लागली होती. तो दिल्ली सारख्या शहरात असणाऱ्या मुलींना नागपूरात हॉटेलमध्ये ठेवायचा. तो मुलींचे फोटो आंबट शौकीन लोकांना व्हाटसअॅपवर पाठवत असे. त्यानंतर त्यांचा पैशांचा व्यवहार आणि जागा ठरला की त्या तरुणींना हॉटेलमध्ये पाठवत.
तरुणींना नागपुरात किमान सात दिवसांसाठी विमानाने आणायचा
आरोपी बंटी हा तरुणींना नागपुरात किमान सात दिवसांसाठी विमानाने आणत होता. त्यानंतर त्यांना विमानाने परत पाठवत होता. यापूर्वी सुद्धा त्याच्यावर अशाच पद्धतीने नागपूर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिलीय.