सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : एका व्यक्तीकडे शस्त्रसाठी असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संशयावरून पाळत ठेवणे सुरू केले. तेव्हा पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली. खासगी कंपनीत असलेल्या व्यक्तीकडे एवढा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कशासाठी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. आता या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कुठून आला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
नागपूरच्या कळमना पोलिसांना रामानंद धुर्वे नावाच्या व्यक्तीकडे शस्त्रांचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी त्यावर काम करायला सुरुवात केली. पोलिसांनी सगळी तयारी करून रामानंद धुर्वेच्या कळमना हद्दीतील वैष्णोदेवी चौकाजवल असलेल्या घरात धाड टाकली. त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडला.
या शस्त्रसाठ्यात १ लोखंडी रिवाल्वर, ३ देशी बनावटीचे कट्टे, १३ जिवंत काडतुसे, ६ खाली केस (काडतूस), १ एअर गन, ३ तलवारी, २ चाकू, १ भाल्याचा पातासह अनेक शस्त्र आणि काही केमिकल जप्त करण्यात आले.
रामानंद दुर्वे हा एका खाजगी कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. मात्र याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आले कुठून आणि त्याचा यामागे काय उद्देश होता याचा तपास पोलीस करत आहे.
एक सर्वसामान्य माणूस एखाद्या खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणारा. मात्र याने आपल्या घरामध्ये एवढा शस्त्रसाठा कशासाठी जमवला. हा सगळा शस्त्रसाठा त्याने कुठून आणला, असे अनेक प्रश्न आहेत. त्याचा शोध आता पोलीस घेताना दिसून येत आहे.
नागपूरच्या कळमना पोलिसांना शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात यश आलं. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. अनेक शस्त्र आणि काही केमिकल जप्त केले. मात्र हे सगळे शस्त्र कुठून आले आणि त्याचा काय वापर होणार होता, याचा तपास पोलीस करत आहे.