Nagpur Video : …आणि पोलिसानं सुरक्षा रक्षकाच्या कानाखालीच ठेवून दिली! नागपुरात नेमकं काय घडलं?
Nagpur Police Viral Video : नागपूरच्या सक्करदरा भागात तिरंगा चौकात एक हॉटेल आहे. तिथेच ही घटना घडली.
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime News) नो पार्किंगच्या (No Parking) वादातून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमधील वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी वाहतूक पोलीस उचलत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक पोलिसाच्या अंगावर धावून गेला. यावेळी झालेल्या वादातून आणि बाचाबाचीमधून पोलिसानं सुरक्षा रक्षकाच्या कानशिलातच लगावली. यामुळे वातावरण अधिकच तापलं. अनेकांची गर्दी वाहतूक पोलिसांच्या आजूबाजूला जमली. मोठा गोंधळ यावेळी झाल्याचं पाहायला मिळाली. प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्हिडीओ (Viral Video) रेकॉर्डिंग करु लागला. परस्परविरोधी आरोप यावेळी करण्यात आले.सुरक्षा रक्षक आणि वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या वादामुळे रस्त्यावर तणाव निर्माण झाला होता.
कुठे घडला प्रकार?
नागपूरच्या सक्करदरा भागात तिरंगा चौकात एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर काही गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. दुचाकी नो पार्किंगमध्ये उभ्या असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याचं ठरवलं. वाहतूक पोलीस टोईंग व्हॅन घेऊन हॉटेलसमोर दाखल झाले. कारवाईला सुरुवात झाली. यावेळी हॉटेलचा सुरक्षा रक्षक पोलिसासोबत हातापायी करु लागला.
नागपुरातील पोलिस आणि सुरक्षा रक्षकात जुंपली.. पोलिसाने कानशिलातच ठेवून दिली… pic.twitter.com/ONn3TtTOjC
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 26, 2022
यानंतर अखेर संतापलेल्या पोलिसांनं सुरक्षा रक्षकाच्याच कालशिलात ठेवून दिली. सुरक्षा रक्षण आणि पोलीस यांच्यातील वद पाहून आजूबाजूला असलेली लोकांची गर्दी जमली आणि लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलिस यांच्यात तुफान बाचाबाची झाली. लोकंही पोलिसाला प्रश्न उपस्थित करु लागले. या घटनेवा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
आता या संपूर्ण घटनेप्रकरणी नागपूर पोलीस नेमकी काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरक्षा रक्षक व्हिडीओ मारहाण करत नसला, तर त्यानं आधी पोलिसासोबत हातापायी करण्यास सुरुवात केली होती, असाही आरोप केला जातो आहे. मात्र सुरक्षा रक्षकावर हात उचलणं कितपत योग्य, असा सवालही उपस्थित केला जातोय. या प्रकारामुळे नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करताना सामान्य लोक आणि पोलिसांमध्ये उडणारे खटकेही अधोरेखित झाले आहेत.