नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवानी पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसापूर्वी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह (Deadbody) आढळून आला होता. याचा तपास करत ग्रामीण पोलिसांनी 36 तासांत या हत्ये(Murder)चे गूढ उकलले आहे. हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रकार असल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश सेलोकर असे मयत इसमाचे नाव असून तो ट्रक चालक आहे. ट्रकमधील माल चोरुन विकण्याच्या हेतूने ट्रक चालकाची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेह जाळला. (Nagpur police succeed in identifying dead body two days ago)
मृतक हा ट्रक चालक असून तो नागपूरवरून मध्य प्रदेशमध्ये लोखंडी पाईप घेऊन जात होता. मात्र रस्त्यात त्याची गाडी खराब झाली. मृतक निलेश सेलोकरने याची माहिती मालकाला दिली. मालकाने कारमधून काही जणांना त्याच्या मदतीसाठी पाठवले. त्यांनी मात्र वेगळाच प्लान आखत गाडीतील माल विकून पैसे वाटून घेण्याचे ठरविले आणि ट्रॅक पेटवला. मात्र ट्रक चालक हा बदलू शकतो असा संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी चालकाला आपल्या कारमध्ये घेऊन घाटात नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केले आणि सोबत असलेले डिझेल टाकून त्याला पेटवून दिलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि एक एक कडी जोडत 3 आरोपींना अटक केली. पैशांची लालच सुटल्याने आरोपींनी हे कृत्य केलं. सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी ट्रकलासुद्धा आग लावली आणि मृतकाचा मृतदेह सुद्धा जाळला. मात्र त्यांची हुशारी पोलिसांच्या समोर चालली नाही आणि पोलिसांनी त्यांचा शोध घेत मुसक्या आवळल्या. (Nagpur police succeed in identifying dead body two days ago)