Nagpur Police | अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 6 तासात 66 जण ताब्यात
नागपुरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याने शहरातील गुन्ह्यातंही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाच जणांना अंमली पदार्थ बाळगताना, तर 61 जणांना अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे ताब्यात घेतलं आहे.
नागपूर : अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई केली आहे. यादरम्यान नागपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तब्बल 66 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागपुरात अंमली पदार्थ्यांच्या तस्करीत वाढ
नागपुरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याने शहरातील गुन्ह्यातंही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
या कारवाईदरम्यान पाच जणांना अंमली पदार्थ बाळगताना, तर 61 जणांना अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी नागपूर पोलिसांनी क्रिकेट बुकी आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली होती. नागपूर पोलिसांनी दोन दिवसांत दोन धडक कारवाया पार पाडल्या आहेत.
नागपुरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी
नागपूर जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. नागपुरात दुधाच्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तस्करी होत होती. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी वाहनासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागपुरातील जरीपटका पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी विजय ट्रेकर्सचे संचालक विजय जेठाणी सह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएच्या मदतीनं पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. नागपुरातून छत्तीसगढमध्ये सुगंधी तंबाखूची तस्करी होत होती.
Special Report : ‘क्रूझ ड्रग्ज पार्टी ते निनावी लेटर बॉम्ब’, आर्यन खानचं संपूर्ण प्रकरण जाणून घ्या एका क्लिकवरhttps://t.co/FnF82Ma3MG#CruizeDrugsParty |#AryanKhan |#SameerWankhede
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021
संबंधित बातम्या :
मी सॅम डिसुझा नाही, माझ्या प्रोफाईचा चुकीचा वापर, पालघर पोलिसांत प्रभाकर साईलविरोधात तक्रार दाखल
Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा