आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ

Nagpur Suicide : आत्महत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आकाश प्रकाश लालबागे असून आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव किरण मारुती काकडे असं आहे.

आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ
नागपुरात दोघांची आत्महत्या, आत्महत्येचं कारण नेमकं काय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:03 PM

नागपूर : नागपुरातून (Nagpur) एकाच वेळा एका तरुण आणि तरुणीनं आत्महत्या केली आहे. आपआपल्या राहत्या घरी गळफास घेऊन दोघांनी आयुष्य संपवल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील (Savner, Nagpur) मताखेडी गावात ही घटना घडली आहे. या गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या करण्यात आली आहे. दोघांनीही आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्यानं संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. या दोन्ही आत्महत्येंचा एकमेकांशी काय संबंध आहे, यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. नागपुरात कुटुंबाला लग्नाला विरोध केल्यावरुन एका अल्पवयीन प्रेमी युगुलानं धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी अशतानाचा आता आणखी एका आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारात बंद घरात गळफास घेतल्याची बाब समोर आल्यानं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.

…म्हणून आत्महत्या?

आत्महत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आकाश प्रकाश लालबागे असून आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव किरण मारुती काकडे असं आहे. आकाश आणि किरण यांच्यात प्रेमसंबंध होते, अशी चर्चा परिसरात सुरु झाली आहे. दरम्यान, या दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिस धक्कादायक घटनेबाबात आता अधिक तपास करत आहेत.

आणखी एका आत्महत्येनं खळबळ

नागपूरच्या नवीन कामठीत एका अल्पवयीन प्रेमी युगुलानं धावत्या ट्रेनसमोर उडी घेत आयुष्य संपवलं होतं. ही घटना ताजी असतानाचा आता नागपुरात आणखी एका तरुणी-तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तपास करण्यासही सुरुवात केली आहे.

अधिक तपास सुरु

तरुणी-तरुणीच्या आत्महत्येचा कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आकाशने गळफास घेत आयुष्य संपवल्यामुळे किरणंही आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. सावनेर पोलिस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

लातूरमधील पोलीस कर्मचारी आत्महत्या प्रकरण, सुसाईड नोटवरुन 12 जणांवर गुन्हा

Pune crime| बापरे! पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला

कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.