VIDEO | धावत्या कारच्या टपावर स्टंटबाजी, नागपुरात तिघा तरुणांवर गुन्हा
धावत्या कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना नागपूर वाहतूक पोलिसांनी हिसका दाखवला. तिघांवर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूर : धावत्या कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना नागपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. स्टंटबाजीचे व्हिडीओ आरोपींनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. कारच्या नंबरवरुन ओळख पटवल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
धावत्या कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना नागपूर वाहतूक पोलिसांनी हिसका दाखवला. तिघांवर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामलाल राठोड, नागेश जोगेकर आणि अमोल काकडे या तिघा तरुणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या मिहानमधील डब्ल्यू बिल्डिंग परिसरात हे तिघे जण धावत्या कारमध्ये स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. कारच्या नंबरवरुन ओळख पटवल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ :
मुंबईतही स्टंटबाजांवर कारवाई
दरम्यान, भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान करणाऱ्या स्टंटबाजांना गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. वाकोला वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर ओंगळवाणं प्रदर्शन करणाऱ्या तरुणांबाबत विलेपार्ले पोलिसांनी अटक केली होती. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकन दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ समोर आला होता. मागील खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत दोन युवक मद्यपान करत असल्याचं यामध्ये दिसत होतं. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करुन त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती.
संबंधित बातम्या :
जीव धोक्यात घालून स्टंटबाजी; पोलिसांनी तिन्ही तरुणांच्या मुसक्या आवळल्या
भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या
(Nagpur Three youths arrested for dangerous stunts in speeding car)