“मैं चोर नहीं हूँ”, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार?

"मैं चोर नहीं हूँ" असं लिहून त्या ट्रक चालकाने आत्महत्या (Nagpur Truck Driver) केली होती. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या कॅबिनला तार बांधून गळफास घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या हात आणि पायावर "मैं चोर नहीं हूँ" असे लिहिलेलं आढळले आहे.

मैं चोर नहीं हूँ, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार?
Nagpur Truck Driver Suicide
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:21 AM

नागपूर : “मैं चोर नहीं हूँ” असं लिहून त्या ट्रक चालकाने आत्महत्या (Nagpur Truck Driver) केली होती. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या कॅबिनला तार बांधून गळफास घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या हात आणि पायावर “मैं चोर नहीं हूँ” असे लिहिलेलं आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण आलंय (Nagpur Truck Driver Allegedly Hanged Himself To Vehicle Found Mai Chor Nahi hu Message On His Hand And Leg In Postmortem).

अशोक जीतूलाल नागोत्रा (वय 40) नावाच्या ट्रक चालकाने मंगळवारी (15 जून) सकाळी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन समोरच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या शवविच्छेदनादरम्यान ही बाब समोर आलीये.

अशोक नागोत्रांविरोधात ट्रक मालकाची पाच दिवसांनी पोलिसात तक्रार

तेल चोरी आरोपाखाली 14 जूनच्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा सापडले नव्हते.

9 जूनच्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जूनला संध्याकाळी कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत ट्रक पोलीस स्टेशनच्या समोर उभा केला.

ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह

मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. शवविच्छेदन करताना त्यांच्या हातावर आणि पायावर मी चोर नाही, असं लिहिलेलं आढळून आले आहे, त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले आहे

अशोक नागोत्रा यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार कोण?

ट्रकमधून तेलाचे पिंप चोरी गेल्याच्या पाच दिवसांनंतर ट्रान्सपोर्ट मालकाने या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्यावर अवास्तव दबाव आणला होता का, त्यांना कोणी मारहाण केली होती का, किंवा प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत?

Nagpur Truck Driver Allegedly Hanged Himself To Vehicle Found Mai Chor Nahi hu Message On His Hand And Leg In Postmortem

संबंधित बातम्या :

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक

लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक

तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.