Nagpur : नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी, हत्याकांडासाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत महिनाभरात एकही हत्या नाही
गेल्या काही महिन्यांमध्ये नागपुर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली. ज्याने नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला. कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
नागपूर : नागपूरकरांसाठी सकारात्मक बातमी तर पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. यामुळे पोलिस आयुक्तांनी नागपूरकरांचे आभार मानले आहेत. नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून ओळखल जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेलं नागपूर हत्यां (Murder)साठी कुप्रसिद्ध होतं. गेल्या वर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB)आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. ही नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे. (No killings have taken place in Nagpur in the last one month)
गेल्या काही महिन्यांमध्ये नागपुर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली. ज्याने नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला. कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. महिनाभरात एकही हत्या न होण्यामागे नागपूर पोलिसांचे विशेष प्रयत्न आणि राबविण्यात येत असलेले वेगवेगळे ऑपरेशन आहे.
पोलिसांनी केलेल्या विशेष उपाययोजनेमुळे हत्या रोखण्यास यश
नागपूर शहरांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकही हत्या न होण्यामागे पोलिसांनी केलेली विशेष उपाययोजना हेच कारण होय. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पाचही झोनच्या डीसीपी, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे टीम तैनात करून गुन्हेगारांवर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. दामिनी पथक मार्फत महिला सुरक्षेवर भर देण्यात आला. सामान्य जनतेच्या विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे सामान्य नागपूरकरांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मात्र हे कायम राहून गुन्हेगारी नियंत्रणात आली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. (No killings have taken place in Nagpur in the last one month)
इतर बातम्या
Pune crime| पुण्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; 924 गुन्हेगारांची झाडाझडती