Nagpur Crime : फिंगर प्रिंटच्या आधारे कुख्यात आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक
नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हातात लागत नव्हते. पोलीस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होती. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली.
नागपूर : कानून के हाथ बहोत लंबे होते है याचीच प्रचिती नागपूरमधील एका घटनेत आली आहे. गुन्हेगाराच्या फिंगर प्रिंट (Finger Print)चा आधार घेत नागपूर पोलिसांनी अकोल्यातून एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक (Arrest) केली आहे. या आरोपीने 10 घरफोड्या केल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. आरोपीच्या दोन साथीदारांना सुद्धा पोलिसांनी अटक करत बराच मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आता आरोपीने आणखी कुठे कुठे चोरी केल्या आहेत, त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत का ? याचा शोध घेत आहेत. (Notorious accused arrested by Nagpur police on the basis of fingerprints)
पोलिसांनी असे पकडले आरोपीला
नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हातात लागत नव्हते. पोलीस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होती. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत पोलिसांनी दोन साथीदारसुद्धा अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.
सोन्याच्या बांगड्या चोरी करणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीच्या आधारे जेरबंद
तनिष्का ज्वेलर्स सेक्टर 17 वाशी येथे दोन महिला सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. तनिष्का ज्वेलर्समधील सेल्स गर्लने दोघांनी बांगड्या दाखवल्या. मात्र त्या महिलांनी गुपचूप 2 लाख 21 हजार रुपये किंमतीचे 2 बांगड्या चोरून नेल्या. जेव्हा दोन बांगड्या दिसल्या नाही, तेव्हा ज्वेलर्सवाल्यांनी CCTV चेक केलं. तेव्हा दोन बांगड्या त्या महिलांनी चोरल्या ही बाब कळताच वाशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास करत तांत्रिक तपासाद्वारे 10 दिवसाच्या आत दोघींना अटक केली आहे. (Notorious accused arrested by Nagpur police on the basis of fingerprints)
इतर बातम्या