कुख्यात गुंड सहा महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला, नागपूरच्या पांढरबोडी भागात घुसताच दुश्मनांनी घेरलं, विटांनी ठेचून हत्या

महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलं आहे (Notorious gangster killed in Nagpur).

कुख्यात गुंड सहा महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला, नागपूरच्या पांढरबोडी भागात घुसताच दुश्मनांनी घेरलं, विटांनी ठेचून हत्या
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरली, कुख्यात गुंडाचा खून
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 3:32 PM

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. नागपुरात बुधवारी (7 जुलै) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली. संबंधित घटना ही नागपूरच्या पांढरबोडी भागात घडली. अवैध दारू विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चार जणांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे (Notorious gangster killed in Nagpur).

मृतक गुंडावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

मृतक गुंडाचे नाव अक्षय जयपूरे असं आहे. अक्षयवर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो नुकतंच सहा महिन्यांआधी जेलमधून बाहेर आला होता. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर सहा महिन्यांनी त्याची निघृणपणे हत्या करण्यात आली. दुसरीकडे नागपुरात पुन्हा एकदा हत्येची घटना घडल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचे काहीच भय नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. या अशाप्रकारच्या गुन्ह्यांना थांबवणं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे (Notorious gangster killed in Nagpur).

नेमकं काय घडलं?

मृतक अक्षय जयपूरे हा नागपूरच्या पांढरबोडी भागात गेला होता. तो रात्रीच्या सुमारास त्या परिसरात गेला होता. तो पांढरबोडी भागात दाखल झाल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर काही जणांनी सापळा रचून त्याला चारही बाजूने घेरलं. त्यानंतर त्याला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत त्यांनी धक्काबुक्की केली. तसेच अक्षयच्या डोक्यात दगड आणि विटाही मारल्या. या भीषण हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ झाला. त्याच्या शरीरातील अधिक रक्त वाहून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपींना बेड्या

संबंधित घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. कारण तोपर्यंत अक्षयचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत एका पाठोपाठ एक अशा एकूण चार जणांना अवघ्या काही वेळेत अटक केली. पोलीस आणखी काही आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

35 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या, जखमी आरोपीचाही मृत्यू

नागपुरात 30 दिवसात 19 खून, टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शोचा परिणाम

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.