Nagpur Murder : नागपूरमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या, दोन आरोपींना अटक

संघर्ष मेत्राम असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून झालेली ही हत्या असली तरी या घटनेमुळे परिसरात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.

Nagpur Murder : नागपूरमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या, दोन आरोपींना अटक
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:36 PM

नागपूर : महिलेवरुन झालेल्या जुन्या वादा (Old Dispute)तून एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना नागपूरच्या प्रताप नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. याप्रकरणी प्रताप नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली असून दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. संघर्ष मेत्राम असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून झालेली ही हत्या असली तरी या घटनेमुळे परिसरात मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.

धरणावर फिरायला गेले असता वाद झाला

मयत संघर्ष मेश्राम आणि आरोपी हे तिघेही अंबाझरी धरण परिसरामध्ये फिरायला आले होते. या तिघांमध्ये जुना वाद होता. काही दिवसांपूर्वी यांच्यात एका महिलेवरुन वाद झाला होता. या वादावरून या तिघांमध्ये रात्री भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी संघर्षच्या डोक्यावर हातोड्याने वार करत त्याची हत्या केली. त्या ठिकाणावरून पळ काढला. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबईत प्रियकराच्या मदतीने महिलेने केली पतीची हत्या

प्रियकराच्या मदतीने एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. रुबीना नसीम शेख आणि मोहम्मद सैफ जुल्फेकार फारूकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पती चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडण करत असे. याच कारणातून पतीची हत्या केल्याची कबुली महिलेने पोलिसांना दिली. हत्या करुन मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. त्यानंतर आरोपी फरार झाले. घरातून वास येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता हत्येची घटना उघड झाली. (One killed due to old dispute in Nagpur, two accused arrested)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.