पाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला
विवेक पालटकर हा पाच जणांच्या हत्येच्या आरोपात कारागृहात शिक्षा भोगत आहे (One prisoner attacked another prisoner at Nagpur central jail).
![पाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला पाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/06/21024355/nagpur-central-jail.jpg?w=1280)
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक विचित्र घटना घडली आहे. पाच कुटुंबियांचा खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एक आरोपी अचानक भडकला. त्याने जेलमध्ये एका कैद्यावर थेट हल्ला चढवला. त्याने कपड्यात दगड बांधला आणि दुसऱ्या कैद्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला. तर झटापट सोडवायला गेलेल दोन जण किरकोळ जखमी झाले. राजू वर्मा असे जखमी कैद्याचे तर विवेक पालटकर असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. विवेक पालटकर हा पाच जणांच्या हत्येच्या आरोपात कारागृहात शिक्षा भोगत आहे (One prisoner attacked another prisoner at Nagpur central jail).
नेमकं काय घडलं?
विवेक पालटकरने नागपूरच्या दिघोरी परिसरात जून 2018 मध्ये जावई, बहीण, जावयाची वृद्ध आई, 12 वर्षीय भाची आणि स्वत:च्या चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून विवेकचे वागणे हे सामान्य होते. परंतु, शनिवारी (19 जून) संध्याकाळी सुमारास विवेकने राजू वर्मा नावाच्या एका कैद्यावर अचानकपणे जोरदार हल्ला केला. कापडात दगड बांधून त्याने राजू वर्मावर हल्ला केला (One prisoner attacked another prisoner at Nagpur central jail).
राजू वर्माच्या डोक्याला दुखापत
घटना ज्यावेळी घडली त्यावेळी पोलिसांकडून कैद्यांची हजेरी घेतली जात होती. यावेळी बऱ्यापैकी कैद्यांची घटनास्थळी गर्दी होती. त्यामुळे मारहाणीच्या वेळी वर्माला वाचवण्यासाठी उपस्थित कारागृह कर्मचारी आणि दुसरे कैदी धावले. यावेळी हल्लेखोर विवेक पालटकर याच्याशी झालेल्या झटापटीत दोन इतर कैदी देखील जखमी झाले. या हल्ल्यात राजू वर्माच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वादामागे कारण काय?
मेडिकलमधील उपचारानंतर जखमी राजू वर्माला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विवेक पालटकर याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या दोन्ही कैद्यात कुठला वाद होता की अचानक विवेक पालटकर आक्रमक का झाला? याचा तपास कारागृह प्रशासन करीत आहे.
हेही वाचा :
ठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार?