अमरावती : अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय (Amravati Police Commissioner’s Office) परिसरात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रवीण राजूरकर (Praveen Rajurkar) (वय 46) असं विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) दाखल करण्यात आलंय. घराजवळील लोक त्रास देत असल्याचा आरोप या युवकानं केलाय. पोलिसांत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची माहिती त्यानं दिली.आज त्यानं चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयचं गाठलं. तिथं विष प्राशन केलं. त्यामुळं पोलीस घाबरले. त्यांनी प्रवीणला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. प्रवीणवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. योग्य वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यानं प्रवीण बचावला.
प्रवीण राजूरकरला एक मुलगा आहे. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी मरण पावली. शेजारचे त्याला तो मुलगा दत्तक मागत आहेत. पण, प्रवीण हा मुलगा दत्तक द्यायला तयार नाही. शेजारचे मला मुलगा मागत आहेत. मुलगा दे तू निघून जा, असं म्हणतात. त्यामुळं त्यानं अमरावती पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण, त्याच्या तक्रारीची कोणी दखल घेत नाही, असं त्याचं म्हणणं आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन केल्यानं पोलीस घाबरले. त्यांनी प्रवीणची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळं प्रवीणचा जीव वाचला. पण, विष प्राशन केल्यानंतर पोलीस घाबरले होते. घरी मुलगा एकटाच आहे. त्यामुळं आता मुलाला कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेजारच्यांनी मला खूप परेशान केले. पोलीस साथ देत नाही, अशावेळी मी काय करू, असा प्रश्न प्रवीण विचारत आहे.