तोकडे कपडे घालून रिसॉर्टवर अश्लील नृत्य; व्यापारी, डॉक्टर उधळत होते पैसे, तेवढ्यात…
उमरेड अभयारण्याच्या आसपास काही रिसॉर्ट आहेत. यापैकी टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी डीजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत काही व्यापारी आणि डॉक्टर पैसे उधळत होते.
नागपूर : जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाजवळ टायगर पॅराडाईज रिसॅार्टवर पोलिसांचा छापा मारला. रिसॅार्टवर झिंगाट पार्टी सुरु होती. अश्लील नृत्य, दारुच्या बाटल्या आणि बरंच काही आढळलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सहा डान्सर मुलींसह १२ पुरुषांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत विदेशी दारुसह रोकड जप्त करण्यात आली. उमरेड अभयारण्याच्या आसपास काही रिसॉर्ट आहेत. यापैकी टायगर पॅराडाईज रिसॉर्टवर मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी डीजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत काही व्यापारी आणि डॉक्टर पैसे उधळत होते. तोकडे कपडे घातलेल्या अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा नृत्य करत होत्या.
पोलिसांनी छापा टाकताच अनेकांचे धाबे दणाणले. काही जणांना पळ काढला. एक जण सर्वांना दारू पुरवत होता. अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक रवींद्र वाघ यांनी दिली.
या डॉक्टर, व्यापाऱ्याचा समावेश
या पोलिसांच्या छाप्यात भंडाऱ्यातील खात रोडवरील डॉक्टर गोपाल सत्यनारायण व्यास (वय ४८), खात रोडवरील ललीत नंदलाल बैस (वय ५०), रामनगरीतील अभय रमेश भागवत (वय ४९) हे उमरेड येथे मौजमजा करायला आले होते. अभय भागवत हे मोठे व्यापारी आहेत. गोपाल व्यास हे भंडाऱ्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. या प्रतिष्ठित व्यक्तींच्या बाबतीत अशी माहिती समोर आल्याने भंडारावासियांना धक्काच बसला.
या आरोपींवर कारवाई
याशिवाय नागपुरातील पंकज हाठीठेले, वर्ध्यातील मनीष सराफ, नागपुरातील समीर देशपांडे, मौद्यातील रजत विनोद कोलते, नागपुरातील मंगेश सुरेश हर्डे, नागपुरातील आशुतोष सुखदेवे, मौद्यातील केशव रवींद्र तरडे, गोधनीतील पारस ज्ञानेश्वर हाठीठेले आणि अरुण अभय मुखर्जी यांच्यासह सहा नृत्यांगणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
हे साहित्य करण्यात आले जप्त
साऊंड लेवल मशीन, एम्प्लीफायर, साऊंड मिक्सर, दोन लॅपटॉप, रॉयल स्ट्रॅग विदेशी दारू, रॉलय चॅलेंज विदेशी दारू, ब्लॅक अँड व्हाईट विदेशी दारू, स्मोक मशीन, ध्वीन उपकरणे आदी साहित्य जप्त करण्यात आले. याची किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये आहे.