19 व्या वर्षी लपून नागपुरात, तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला 11 वर्षांनी अटक

नागपूरमध्ये तालिबानी समर्थक असलेल्या अफगाणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. नूर मोहम्मद असं या 30 वर्षीय अफगाणी तरुणाचं नाव आहे.

19 व्या वर्षी लपून नागपुरात, तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला 11 वर्षांनी अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 4:14 PM

नागपूर : नागपूरमध्ये तालिबानी समर्थक असलेल्या अफगाणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. नूर मोहम्मद असं या 30 वर्षीय अफगाणी तरुणाचं नाव आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो नागपुरात लपून राहत असल्याची माहिती आहे. (pro-Taliban Afghan arrested,Taliban arrested Nagpur, Taliban, Nagpur police)

नूर मोहम्मद हा नागपूरमधील दिघोरी भागात छुप्या पद्धतीनं राहत होता. त्या तरुणाच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तालिबानी अतिरिक्यांना सोशल मीडियावर फॅालो करत असल्याने, त्याच्याभोवती संशय बळावला होता, त्यामुळे नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

नागपुरात नूर मोहम्मदचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोधही घेण्यात येत आहे. या अफगाणी नागरिकाला परत अफगाणिस्तानला पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

हा तरुण तालिबानी दहशतवाद्यांशी सतत संपर्कात होता की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर तो ज्या तालिबानी दहशतवाद्यांना फॉलो करत होता, त्यांच्याशी त्याचा काय संबंध आहे? याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना कारावास

एनआयए विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 2012 मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी नेते आणि पत्रकारांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी 2012 मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले

काय होता कट?

सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरुसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडवण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एनआयएने कोर्टाला सांगितले.

अटकेतील दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

कोर्टाने मंगळवारी मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. एनआयएनुसार अकरम रोजगाराच्या बहाण्याने सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्याच्या वेळी त्याची ओळख पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या विविध सदस्यांशी झाली.

इतर बातम्या

Special Report | झेलमच्या किनारी दहशतवादी अड्डे, चीनची पाकिस्तानला मदत

(pro-Taliban Afghan arrested,Taliban arrested Nagpur, Taliban, Nagpur police)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.