नागपुरात देहव्यापाराचा पर्दाफाश, दोन पीडितांची सुटका; पोलिसांनी अशी केली कारवाई

हॉटेलमध्ये दोन मुलींना वेगवेगळ्या दलाला मार्फत पाठविण्यात आलं होतं. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यांनी सापळा रचत आधी त्या ठिकाणी आपला फंटर पाठवलं.

नागपुरात देहव्यापाराचा पर्दाफाश, दोन पीडितांची सुटका; पोलिसांनी अशी केली कारवाई
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 8:48 PM

नागपूर : नागपुरात (Nagpur Police) सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. बेलतरोडी परिसरातील (Beltarodi Police) एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू होता. याचा माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. दलालामार्फत मुली पुरविल्या जात असल्याचं या घटनेतून समोर आलं. या प्रकरणी दोन मुलींची सुटका करण्यात आली. एका दलालाला अटक करण्यात आली. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली. गरजू मुलींना पैशाचे आमिष दाखविले जाते. तसेच लग्न करणार असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांना देहव्यापारात ओढलं जातं.

एका दलालाला अटक

हॉटेलमध्ये दलाल मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यावर कारवाई करायचं ठरविलं. त्या प्रकरणाची माहिती काढली. बेलतरोडीतील हॉटेलमधील माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी फंटरला पाठविल्यावर दोन दलाल सापडले. या दोन्ही दलालांनी मुली पुरविल्या होत्या. निरज गणेश टेंबरे (वय २६) हा रामश्वरी येथील रहिवासी दलाल आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा अशाप्रकारची कामं करतो. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असं आमिष हा मुलींना दाखवत होता. त्यानंतर अशाप्रकारचा व्यवसाय करून घेतात.

व्हॉट्सअपवरून मुलींचे फोटो शेअर

रेहान रमजान शहा नावाचा दुसरा आरोपी आहे. हा नगर येथील नेवासा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वीचे पाच-सहा गुन्हे दाखल आहेत. व्हॉट्सअपवर हे मुलींचे फोटो दाखवितात. रेफरन्स देऊन मुली पुरवत होता. या दुसऱ्या आरोपीला अद्याप अटक व्हायची आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.

दुसऱ्या मुलीचा रेट १५ हजार

दोन फंटर पाठविले होते. दोन पीडित मुली सापडल्या आहेत. एका मुलीचा १२ हजार, तर दुसऱ्या मुलीचा १५ हजार रुपये नाईट असे रेट ठरलेले होते. ओयेच्या हॉटेलमध्ये असे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली होती. हॉटेलचे रजिस्ट्रेशन असले पाहिजे. तसेच आधार कार्ड असला पाहिजे. रुम बूक केल्यानंतर तिथं काय होतं हे आम्हाला माहीत नाही, असा पवित्रा ओये हॉटेलचा असतो, असंही पोलिसांनी सांगितलं.

एका रात्रीचा रेट ठरला

हॉटेलमध्ये दोन मुलींना वेगवेगळ्या दलाला मार्फत पाठविण्यात आलं होतं. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यांनी सापळा रचत आधी त्या ठिकाणी आपला फंटर पाठवला. सौदा केला. त्यानुसार, एका मुलीचा 12 हजार रुपये एका रात्रीचा रेट असल्याचं ठरलं. नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत एका दलालाला अटक केली. दोन मुलींची सुटका करण्यात आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.