मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण, 6 सिनीअर्सला होस्टेलबाहेर काढले, पोलिसांत तक्रार
मात्र आम्ही सांगू इच्छितो कोणी ही कोणाच्या दबावात न येता अशा गोष्टीची तक्रार करा.
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सिनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मेडिकल प्रशासनाने 6 सिनियर्सला होस्टेलमधून काढण्यात आले. त्यांच्या विरोधात पोलिसात एफआरआय दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितलं. दिल्ली सेंट्रल कमिटीकडून एक ईमेल आला. त्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये रॅगिंग झाली आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा त्यांनी पाठवला. ते पाहून आम्ही तपासणी केली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कारवाई केली.
त्यामध्ये सिनिअर विद्यार्थ्यांनाकडून फर्स्ट इयरच्या मुलांची रॅगिंग घेताना दिसून येत आहे. त्यावरून आम्ही त्यावर कारवाई केली. अँटी रॅगिंग कमिटीच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई केली असल्याचं डॉ. राज गजभिये म्हणाले.
सहा इंटर मुलांना हॉस्टेलमधून डी बार (काढण्यात) करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली. ही घटना सहा महिने आधी झालेली आहे. त्याचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ आता त्या मुलांनी सेंट्रल कमिटीला पाठवलाय.
आम्ही तीन तासाच्या आत सगळी कारवाई केली. पण घटना सहा महिने आधीची आहे. सीनियर विद्यार्थ्यांच्या प्रेशरमध्ये असल्याने त्यांनी कदाचित तक्रार करायला एवढा वेळ लावला असावा.
मात्र आम्ही सांगू इच्छितो कोणी ही कोणाच्या दबावात न येता अशा गोष्टीची तक्रार करा. आम्ही कारवाई करू. मानसिक प्रतारना आणि शारीरिक प्रतारनासुद्धा झाल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे, असंही मेडिकलचे अधिष्ठाता यांनी सांगितलं.