नागपूर : प्रतापनगर ( Pratapnagar) परिसरातील फ्रेंड्स कॉलनीमधील ही घटना. एका घरातील रहिवासी कामानिमित्ताने हैदराबादला गेले होते. संधीचा फायदा घेत अमोल राऊत नावाच्या कुख्यात चोरट्याने त्यांच्या घरावर डल्ला मारला. चारशे पन्नास ग्राम सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला. मात्र हा कुख्यात आरोपी पोलिसांच्या नजरेतून वाचू शकला नाही. 24 तासांतच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या आरोपीवर चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला (Butibori) राहतो. भाजीचा व्यवसाय करतो. मात्र नागपुरात येऊन तो चोऱ्या करतो. यावेळी मात्र त्याच्या नशिबाने साथ दिली नाही. तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून 450 ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा हस्तगत करण्यात आले. अशी माहिती डीसीपी लोहित मतानी (Lohit Matani) यांनी दिली.
अमोल राऊत हा मुळचा बुटीबोरीचा. तसा तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. पण, त्याव्यतिरिक्त तो चोऱ्या करायचा. त्यासाठी तो नागपूर शहरात यायचा. इथं आल्यानंतर घरी कुणी नसल्याचं पाहून त्या घरी चोऱ्या करत होता. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरी कुणीचं नव्हते. याचा त्यानं गैरफायदा घेतला. घरी घुसून काही मिळते का ते शोधलं. त्याला सोनं सापडलं. ते घेऊन तो पसार झाला. संशयावरून अमोलला ताब्यात घेण्यात आलं. त्याने चोरी तसेच घरफोड्या केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्याविरोधात चोरी, घरफोडीचे आधीहे गुन्हे आहेत. बरेचदा तो पोलीसांच्या तावडीतून निसटला. यावेळी मात्र, पोलिसांनी त्याला कोठडीचा रस्ता दाखविला.
नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक करण्यात यश मिळविले. त्याने चारशे पन्नास ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. संपूर्ण दागिने पोलिसांनी हस्तगत केले. शिवाय प्रतापनगर पोलिसांनी आरोपीच्या बेड्या ठोकल्या. चोर कितीही शातीर असला तरी पोलिसांच्या नजरेतून जास्त वेळ वाचू शकत नाही. हे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येते.