Nagpur Crime | वडिलांच्या मित्रासोबत पाठविले, त्याने अल्पवयीन मुलीवर केला अनैसर्गिक अत्याचार, नागपुरात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

नागपूर शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत सहा वर्षीय मुलीसोबत 53 वर्षीय नराधमाने दुष्कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

Nagpur Crime | वडिलांच्या मित्रासोबत पाठविले, त्याने अल्पवयीन मुलीवर केला अनैसर्गिक अत्याचार, नागपुरात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 4:39 PM

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. मुलीच्या आईने वडिलांच्या मित्रासोबत मुलगा व मुलीला पाठविले. त्याने मुलाला घरी परत पाठविले. मुलीवर अनैसर्गिक अत्याचार (Atrocities) केला. त्यामुळं आरोपीविरोधात पोक्सा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तालीब कमाल (Talib Kamal) ऊर्फ बैहरा खालीद अंसारी (वय 53) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पाचपावली पोलीस (Pachpavli Police) ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेचे वडील आणि आरोपी हे सोबतच मजुरी करतात.  ओळख आहे. एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. आरोपीचे लग्न झाले नाही. तो घरी एकटाच राहतो. 18 जून रोजी तालीब पीडित मुलीच्या घरी आला. घरी पीडितेसह तिची आई आणि तीन वर्षीय लहान भाऊ घरी होता. पीडितेच्या आईने मुलीचे वडील घरी नसल्याचे सांगितले. शिवाय पीडित मुलगी आणि तिच्या भावाला आरोपीसोबत पाठविले. यांचे वडील भेटल्यानंतर त्यांच्यासोबत घरी पाठवा असे सांगितले. तालीब हा दोन्ही मुलांना घेऊन गेला. काही वेळानंतर पीडितेचा भाऊ घरी आला. आईने त्याच्या बहिणीबाबत विचारणा केली. मुलगी घरी आली नसल्यामुळे तिने मुलीची शोधाशोध सुरू केली. तिकडे तालीबने पीडितेला बगिच्यात नेले. त्यानंतर घरी आणून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला.

भांडण करून आरोपीला मारहाण

आरोपीने पीडित मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडले. आई मुलीच्या शोधात मामाकडे पोहचली. तेव्हा तिला तिची मुलगी सापडली. आईने तिला कुठे गेली होती, यासंदर्भात विचारले. दुसर्‍या दिवशी तिला उठण्या-बसण्याकरिता त्रास व्हायला लागला. आईने पुन्हा तिची विचारपूस केली. पीडितेने सर्व घटनाक्रम सांगितला. मुलीसोबत झालेला प्रकार एकूण आईला धक्काच बसला. त्यांनी वडिलांना माहिती दिली. रागाच्या भरात वडील हे आरोपीच्या घरी पोहोचले. त्याच्यासोबत भांडण करून त्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांविरुद्घही गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलीचे मेडिकल केल्यानंतर दुष्कृत्याची स्पष्टोक्ती झाली.

अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

नागपूर शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत सहा वर्षीय मुलीसोबत 53 वर्षीय नराधमाने दुष्कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या नराधमाला पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही या नराधमावर 2015 मध्ये एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.