Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज

तुमची ‘वैयक्तिक माहिती सोशल मिडीयामध्ये देणं टाळा, अनोळखी व्यक्तींसोबत संवाद करु नका, असा सल्ला सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसेल यांनी दिला आहे. (Sextortion Frauds Cases Increase in Nagpur know all details)

सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं, नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 9:05 AM

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी नागपूर : नागरिकांनो सावधान! तुमच्याभोवतीही सेक्सटॉर्शनचं जाळं फिरत आहे. सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून खंडणीची वसूली केल्याच्या अनेक घटना नागपुरात समोर आल्या आहेत. त्यामुळे या नव्या सायबर क्राईमचं पोलिसांसमोर चॅलेंज पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमची ‘वैयक्तिक माहिती सोशल मिडीयामध्ये देणं टाळा, अनोळखी व्यक्तींसोबत संवाद करु नका, असा सल्ला सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसेल यांनी दिला आहे. (Sextortion Cyber Crime Frauds Cases Increase in Nagpur know all details)

सेक्सटॅार्शन म्हणजे काय?

तुमच्या मोबाईलवर एखाद्या नव्या नंबरवरुन मॅसेज येतो. एखादी तरुणी मॅसेजवर पर्सनल बोलायला लागते. मग वारंवार मॅसेज, नको तो संवाद आणि शेवटी अश्लील व्हिडीओ कॅाल, अशाच पद्धतीनं अनेक जण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर मग ब्लॅकमेलिंग करत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरु होतात.

सेक्सटॅार्शन….या सायबर जगतातील नव्या गुन्हेगारीनं अनेकांची झोप उडवली आहे. एकटे राहणारे तरुण, व्यावसायिक, प्रतिष्ठीत आणि काही मोठ्या लोकांवर सोशल माध्यमातून जाळं फेकायचे. त्यांच्याकडून पैसे उकळायचे. नागपूरसह अनेक मोठ्या शहरात सेक्सटॅार्शनचे गुन्हे घडतात. काही पोलिसांकडे तक्रार करतात, तर काही बदनामीच्या भितीनं सेक्सटॅार्शनचे बळी पडतात.

सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सेक्सटॅार्शनन म्हणजे काय? त्याला लोक कशी बळी पडतात, या जाळ्यात कशी अडकतात, याची माहिती दिली आहे.

नागपूर पोलिसांकडे अनेक तक्रारी

लॅाकडाऊनच्या काळात लोकं घरात होती. बराच वेळ असल्याने काहींनी विरंगुळा म्हणून तर काही आंबटशौकीन म्हणून सेक्सटॅार्शनच्या फेकलेल्या जाळ्यात स्वत:हून अडकत गेले. नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे सेक्सटॅार्शनच्या काही तक्रारीही दाखल करण्यात आल्या. तर काही बदनामीच्या भितीनं तक्रार करायला पुढे येत नाहीत.

सोशल मीडियावर वावरताना काळजी घेणं गरजेचे

सोशल माध्यमात मुक्तपणे वावर, व्यक्त होताना लोक फारसा विचार करत नाही. मग तुमचे फोटो, स्टेटस, कपडे, राहणीमान, तुमच्या आवडी निवडी, तुम्ही कुठले फोटो लाईक्स करता, कशावर जास्त कमेंट्स करता यावरुन तुम्हाला हेरलं जातं. सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात अडकवलं जातं. त्यामुळे सोशल माध्यमांवर वावरताना काळजी घेणं गरजेचं आहे. (Sextortion Cyber Crime Frauds Cases Increase in Nagpur know all details)

संबंधित बातम्या : 

“मैं चोर नहीं हूँ”, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार?

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

संतापजनक ! मुलांसोबत खेळण्यासाठी कुत्र्याचं पिल्लू आणलं, इसमाचं डोकं सटकलं, थेट गच्चीवरुन खाली फेकलं

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.