Nagpur Crime | धक्कादायक! फिरायला गेलेल्या पाच वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला, काटोलमधील मुलाचे लचके तोडले

आज या कुत्र्यांनी कहरच केला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला. सोबत मोठी ताई होती. पण, कुत्र्यांनी मुलाला सावज केलं. तो घाबरला. पळू लागला. कुत्रे त्याच्यामागे धावले. तो भीतीपोटी सैरभैर झाला. कुत्र्यांचा कडप असल्यानं त्यांनी एकत्रितपणे हल्ला केला. यात मुलाचे लचके तोडले.

Nagpur Crime | धक्कादायक! फिरायला गेलेल्या पाच वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला, काटोलमधील मुलाचे लचके तोडले
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 11:27 AM

नागपूर : जिल्ह्यातील काटोलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत (Sister) मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेला. त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. कुत्र्यांच्या कळपाने (Herd) पाच वर्षीय चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा रोज सकाळी मोठ्या बहिणीसोबत फिरायला जायचा. आज सकाळी तो घरातून बाहेर पडला. रस्त्याने जात असतानाच मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर बहीण जोरजोरात आरडाओरडा करत राहिली. लोक येताना दिसताच कळपाने मुलाला फरफटत दूर खेचत नेलं. यात चिमुकल्याच्या अंगांचे काही भाग कुत्र्यांनी खाल्याने त्याचा मृत्यू झाला.

काटोलमध्ये काय घडलं

पाच वर्षांचा चिमुकला. रोज ताईसोबत फिरायला जायचा. आजही सकाळी तो ताईसोबत होता. नेहमी कुत्रे दिसत असल्यानं तो तसा घाबरत होता. पण, आज या कुत्र्यांनी कहरच केला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला. सोबत मोठी ताई होती. पण, कुत्र्यांनी मुलाला सावज केलं. तो घाबरला. पळू लागला. कुत्रे त्याच्यामागे धावले. तो भीतीपोटी सैरभैर झाला. कुत्र्यांचा कडप असल्यानं त्यांनी एकत्रितपणे हल्ला केला. यात मुलाचे लचके तोडले.

लोकं धावले तोपर्यंत…

मुलगा भीतीपोटी पळत होता. त्याची बहीण त्याला वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. शेवटी लोकं धावून आले. पण, कुत्र्यांनी त्या चिमुकल्याला सोबत फरफटत नेले. लोकं धावत होते. कुत्रे त्या मुलाला घेऊन पळत होते. अधाशासारखे कुत्र्यांनी मुलाचे लचके तोडले. त्यात मुलाच्या पायाला, हाताला तसेच पोटाला जखमा झाल्या. रक्तबंबाळ मुलगा आकांताने ओरडत होता. लोकांनी कुत्र्यांना हाकलले. पण, तोपर्यंत मुलाचा जीव कुत्र्यांनी घेतला होता. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. मोकाट कुत्रे हे घातकं असतात. हे बहुधा सिद्ध झालं. नगर परिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण, तक्रार झाल्यानंतर त्यांना जाग येते. अशा प्रकारच्या घटनांनी समाजमन सुन्न होतं. निरागस मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागतो.

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.