भरधाव स्कूल बसचं नियंत्रण सुटलं, विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांची मागणी काय?
य घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप आहे
नागपूर – स्कुल बसचं नियंत्रण सुटून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पालक आक्रमक झालेत. नागपूरच्या म्हसाळा येथील मेरी पूसपॅन्स अकादमीत शाळेला जाब विचाराला पोहचले. माझ्या मुलाच्या मृत्यूला शाळा जबाबदार आहे, असा आरोप मृतक विद्यार्थ्याच्या पालकांनी केलाय. शाळेविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक सम्यकच्या वडील दिनेश कळंबे यांनी केली. चार दिवसांपूर्वी म्हसाळा येथील मेरी डान्स पुसपॅन्स अकादमीची शाळा सुटली. त्यानंतर शाळेबाहेर स्कूल बस निघताना चालकाचे नियंत्रण सुटलं. यात आठव्या वर्गात शिकणाऱ्या सम्यकच्या बसच्या चाकाखाली चिरडल्या गेला. यात सम्यकचा मृत्यू झाला.
य घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळं शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाचे वडील करत आहेत.
अपघातानंतर सम्यकला दवाखाण्यात न नेता शाळेच्या आवारात आणून ठेवले. यात 20 मिनिटे गेले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सम्यकचे वडील दिनेश कळंबे यांनी केला. त्यामुळे शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आहेत.
सम्यकच्या वडिलांसह शाळेत शिकणाऱ्या अनेक पालकांनी आपला रोष व्यक्त केला. आक्रोश व्यक्त करण्यासाठी पालक शाळेत पोहचले. यावेळी शाळेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या घटनेमुळं पालकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर परत केव्हा येईल, याची वाट पालक पाहत असतात. उशीर झाल्यास त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. अशा घटना टाळण्यासाठी चालक सुज्ञ असणं आवश्यक आहे. कारण चालकाच्या भरोशावर स्कूल बस किंवा व्हॅन असते.