Nagpur accident : मौद्यात स्वीफ्ट कारने दुचाकीला चिरडले, बाईकवरील दोघेही पुलाखाली कोसळले, कारमधील तीन जण जखमी

छायाचित्रांवरून अपघातानंतरची भयानक परिस्थिती समोर आली. एक महिला खाली पडलेली दिसत आहे. पुलियाच्या खाली जाऊन लोकं पुलावरून पडलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

Nagpur accident : मौद्यात स्वीफ्ट कारने दुचाकीला चिरडले, बाईकवरील दोघेही पुलाखाली कोसळले, कारमधील तीन जण जखमी
मौद्यात स्वीफ्ट कारने दुचाकीला चिरडले, बाईकवरील दोघेही पुलाखाली कोसळलेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 10:15 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौद्यात मोठा अपघात झाला. मौदा पुलावर स्वीफ्ट कारने दुचाकीला उडविले. हा अपघात अतिशय भीषण होता. स्वीफ्टनं धडक देताच बाईकवरून दोघेही सरळ पुलाच्या खाली कोसळले. ते दोघेही नदीपात्रात पडले. त्यात एक महिला व पुरुष असल्याचं सांगण्यात आले. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. स्वीफ्ट कारमधील तिघे जखमी झाले आहेत. ही घटना मौदा पुलावर (At Mauda Bridge) घडली. अपघात इतका भयानक होता की, पुलावरील कठड्याला आदळून स्वीफ्टवरील कार तसेच बाईक चेंदामेंदा ( bike Chendamenda) झाल्यात. नागपूर ते भंडारा या मार्गावर ( Nagpur to Bhandara Marg) मौदा पुलिया येतो.

अपघात कसा झाला

एका बाजूनं स्वीफ्ट येत होती. तिचा वेग जास्त होता. अशात समोरून बाईक येत होती. तेवढ्यात स्वीफ्टनं बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत पुलाच्या बाजूला असलेल्या कठड्यापर्यंत स्वीफ्ट व बाईक शिरली. स्वीफ्टच्या धडकेत बाईकवरील दोघेही पुलावरून खाली कोसळले.

स्वीफ्ट चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात?

हा अपघात इतका भयानक होता की, बाईकवरून नदीपात्रात कोसळलेल्यांचा शोध घ्यावा लागला. ते पुलावरून खाली कोसळल्यानं नदीपात्रात वाहून गेले की, आणखी काही झाले, हे अद्याप कळू शकले नाही. छायाचित्रांवरून अपघातानंतरची भयानक परिस्थिती समोर आली. एक महिला खाली पडलेली दिसत आहे. पुलियाच्या खाली जाऊन लोकं पुलावरून पडलेल्या दोघांचा शोध घेत आहेत. स्वीफ्ट कारमधील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली होती. स्वीफ्ट चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.