लग्नापूर्वीचं प्रेमप्रकरण अडचण ठरू लागलं, ती त्याला करायची वारंवार पैशाची मागणी, त्यानं कंटाळून…
त्याच्या पिशवीत आढळलेल्या सुसाईट नोटमध्ये कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आले.
तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : लग्नापूर्वीची मैत्रीण वारंवार पैसे मागत होती. या ब्लॅकमेलींगला (blackmail) कंटाळून विवाहित तरुणानं (married youth) आत्महत्या केली. असं तपासात पुढं आलं. या प्रकरणी तरुणीसह दोघांवर साकोली पोलीस (police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. साकोली तालुक्यातील उमरी येथील राजेश रामकृष्ण वाघाडे (वय 32) असं मृतकाचं नाव आहे. या प्रकरणी अर्जुनी सडक तालुक्यातील कोसबी येथील अस्मिता सीताराम भोयर (वय 23) आणि साकोलीतील तिलक ठाकरे (वय 27) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गेल्या शनिवारी तरुणाचा मृतदेह मोहघाटा जंगलात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या पिशवीत आढळलेल्या सुसाईट नोटमध्ये कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आले. राजेशने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये अस्मिता त्याला वारंवार पैशाची मागणी करीत होती.
तसेच तिलक ठाकरे तिला पाठिंबा देत होता. शिवाय परिवारासह राजेशला बरबाद करेन, अशी धमकी दिली. त्यामुळं आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं. या याप्रकरणी तरुणीसह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास साकोली पोलीस निरीक्षक खोकले करीत आहेत.
राजेश हा अस्मिताला समजवण्याचा प्रयत्न करत होता. माझं लग्न झालं आता जुने दिवस विसर. पण, अस्मिता काही ऐकायला तयार नव्हती. ती वारंवार पैशाची मागणी करायची. तिची कटकट केव्हा संपेल, असं राजेशला वाटायचं.
पण, त्याचा संयम सुटला. शेवटी त्यानं या कटकटीपासून दूर जाण्याचं ठरविलं. मात्र, जाताना अस्मिताचा खरा चेहरा समोर आणला. आता पोलीस अस्मिता आणि तिलक यांचा कसून तपास करत आहेत. त्यावरून तपासाची दिशा स्पष्ट होईल.