नागपूरच्या जरीपटका पोलीस (Jaripatka Police) स्टेशन हद्दीत घरफोडीची (burglaries) घटना घडली. विश्वासनगर (Vishwasnagar) परिसरातील विकास बिराणी हे काही दिवसांपासून घराबाहेर कामानिमित्त गेले होते. त्यांचे घर एक महिन्यापासून बंद होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली . बियाणी यांनी जरीफटका पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. त्यांच्या घरून जवळपास तीन लाख 29 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरांनी चोरून नेला .
तपासादरम्यान गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. संशयितांची विचारपूस केली. त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरट्यांकडून घरफोडीचे आणि चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी आकाश वरठी याच्यावर या आधीचे गुन्हे आहेत. त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती जरीपटकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईत यांनी दिली.
नागपुरात घरफोडीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जरीपटका पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या कुख्यात गॅंगचा पर्दाफाश केला. या गॅंगच्या मुखीयावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
शहरात वाढत असलेल्या घरफोड्यांचे प्रमाण बघता पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली. मोठ्या कारवाया सुरू केल्या. मात्र गुन्हेगारांवर निर्बंध लागणार का हा प्रश्न आहे .
जरीपटका भागात घरफोडीचं प्रमाण वाढले होते. त्यामुळं पोलिसांत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींवर नियंत्रण कसं मिळवायचं असा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. या गँगचा पर्दाफाश झाल्यानं यावर काही प्रमाणात नियंत्रण बसेल, असं पोलिसांना वाटतं.