युवक महिलेला भेटायला आला, संशयातून पतीने पत्नीला संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

आईचा मृत्यू झाला असून वडिलांना देखील कारावास होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या रागाच्या भरात या दोन मुलींच आता नुकसान होणार आहे.

युवक महिलेला भेटायला आला, संशयातून पतीने पत्नीला संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 8:26 AM

नागपूर : एका बाजूने नागपूर शहरात महिला दिन साजरा होत असतानाच, दुसऱ्या बाजूने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील मिनीमातानगरात अमर आणि लतिका भारद्वाज हे दाम्पत्य राहतात. अमर भाजीपाला विक्री करायचा, तर मृतक लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. दोघांनाही दोन मुली असून अमर हा संशयी स्वभावाचा आहे. ललितावर तो नेहमी संशय घ्यायचा त्यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे. काही वेळा तर वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहायचे काही कामाने एक युवक लतिकाच्या घरी आला अमरने त्याला विरोध केला.

छोट्या मुलींचं काय होणार?

यावरून अमरचा आणि लतिकाचा वाद झाला. वाद इतका वाढला की अमरने लतिकाला घरात बोलवून तिच्यासोबत कडाक्याचे भांडण केले. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यात लतिकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या दाम्पत्याच्या दोन्ही मुलींवर आता एकटं राहण्याची वेळ आलीय. आईचा मृत्यू झाला असून वडिलांना देखील कारावास होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या रागाच्या भरात या दोन मुलींच आता नुकसान होणार आहे.

नेमकं काय घडलं?

सतत भांडणे होत असल्याने एकाच घरात हे पतीपत्नी वेगवेगळे राहत होते. मंगळवारी दुपारी प्लबिंगचे काम करण्यासाठी एक युवक आला. अमरने त्याला विरोध केला. यावरून अमरचा व लतिकाचे भांडण झाले. सणाचा दिवस असल्याने ललिकाने अधिक वाद न वाढविता शांत राहणे पसंत केले. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी तिने कळमना पोलीस ठाण्यात अमरविरोधात तक्रार केली. तक्रारीचा राग मनात ठेवून अमरने पत्नी लतिकाशी भांडण केले. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यात लतिका गंभीर जखमी झाली. तिचा घरातच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अमरला अटक केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.