Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार्म हाऊसवर दरोडा, लाखोंची चोरी, एकाची हत्या, पैसे ठेवणारेच निघाले चोर

फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकून एकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे (Thiefs murder man and robbed money in Farm house at Nagpur).

फार्म हाऊसवर दरोडा, लाखोंची चोरी, एकाची हत्या, पैसे ठेवणारेच निघाले चोर
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 6:53 PM

नागपूर : फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकून एकाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या 37 लाख रुपये देखील ताब्यात घेतले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईने त्यांचं कौतुक केलं जात आहे. संबंधित घटना ही 20 जून रोजी घडली होती. पोलिसांनी तीन दिवसात या घटनेचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनीच हे कृत्य केलं (Thiefs murder man and robbed money in Farm house at Nagpur).

नेमकं प्रकरण काय?

ज्ञानेश्वर फुले नामक वकिलाचे कुही येथील मांगली शिवारात शेती आणि फार्म हाऊस आहे. त्यांनी शेतीची देखरेख करण्यासाठी नरेश दशरथ कुरुडकर यांना जबाबदारी दिली होती. ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह सोमवारी (20 जून) शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेश कुरुडकरचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत कुही पोलिसांना माहिती दिली. या घटनेचा तपास करत असताना फार्म हाऊसमध्ये ठेवलेली रक्कम सुद्धा चोरीला गेल्याची माहिती समोर आली (Thiefs murder man and robbed money in Farm house at Nagpur).

पोलिसांनी तपास कसा केला?

पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीनुसार तपासाची चक्रे फिरवली. फार्म हाऊसमध्ये ज्या व्यक्तीने पैसे ठेवले त्याच व्यक्तीने पैसे लुबाडण्याच्या हेतून कदाचित दरोडा टाकून नरेश याचा खून केला असावा, असा अंदाज बांधण्यात आला. पोलिसांनी शेतात काम करणाऱ्या सर्व कामगारांची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान पोलिसांना अविनाश नरुळे आणि राकेश महाजन यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.

आरोपींकडून 37 लाख हस्तगत

दरम्यान, ज्ञानेश्वर फुले यांच्या फ्रॉम हाऊस मधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली या संदर्भात संभ्रम आहे. मात्र पोलिसांनी अविनाश नरुळे आणि राकेश महाजन या दोन आरोपींकडून 37 लाख रुपये जप्त केले आहेत.

हेही वाचा : नाकातली नथनी दाखवा, पैंजण घेऊन महिला पसार, सीसीटीव्हीत चोरी कैद

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.