Nagpur Crime : नागपूरमध्ये दागिने चोरायचे अन् जालन्यात विकायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

नागपूरमध्ये घरफोड्या करणारी गँग सक्रिय झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर या गँगचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे.

Nagpur Crime : नागपूरमध्ये दागिने चोरायचे अन् जालन्यात विकायचे, 'असे' अडकले पोलिसांच्या जाळ्यात
घरफोडी करणारी गँग अटक
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 2:53 PM

नागपूर / 30 ऑगस्ट 2023 : नागपूरमध्ये चोऱ्यांचे सत्रही वाढले आहे. बंद घरांना टार्गेट करुन रात्रीच्या सुमारास ही टोळी घरफोडी करायची. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका गँगच्या तिघांना अटक केली आहे. घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले असून, लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस तीन घरफोड्यांचा तपास करत होते. मात्र आरोपींची चौकशी केली असता पाच घरफोड्यांचा उलगडा झाला. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. वाढती गुन्हेागारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिसांकडून पाच घरफोड्यांचा उलगडा

नागपूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. उमरेड, कुही, बुट्टीबोरी या भागात घरफोडी करणारी गँग सक्रिय होऊन रात्रीच्या वेळी घरफोडी करायची. यावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी लक्ष केंद्रित करत एका घरफोडी करणाऱ्या गँगमधील तिघांना अटक केली. मात्र त्यांचा तपास करत असताना पाच घरफोडीच्या घटना वेगवेगळ्या भागात आरोपींनी केल्याचं उघड झाले.

नागपूरमध्ये दागिने चोरायचे अन् जालन्यात विकायचे

ही गँग इथे चोरी करायची आणि सोन्या चांदीचे दागिने विकायला जालना येथील एका सोनाराकडे जायचे आणि त्यातून पैसे मिळवायचे. या आरोपीकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला. या गँगच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या तर आवळल्या. मात्र या गँगमध्ये आणखी सदस्य असण्याची शक्यता असल्याने पोलीस तपास करत आहे. या व्यतिरिक्त यांनी आणखी कुठे घरफोडी केली का? याचा सुद्धा शोध घेत आहे.

हे सुद्धा वाचा

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.