Nagpur Railway Police | रेल्वेतून विशाखापट्टणम टू दिल्ली गांजा तस्करी, 8 बॅग्समधून 108 किलो गांजा जप्त, नागपुरात 7 आरोपींना रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रेल्वेमधून गांज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. विशाखपट्टणममधून दिल्लीमध्ये विक्रीसाठी छुप्या पद्धतीने गांजाची तस्करी केली जाते. यासाठी महिला आणि पुरुषांची टोळी सक्रिय आहे. रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्ब्यात बसून नियोजित पद्धतीने एका जागेवरून दुसऱ्या जागी ही तस्करी केली जाते. 108 किलो गांजासह 7 आरोपींना अटक करण्यात आली.
नागपूर : रेल्वे पोलिसांनी तस्करी विरोधात विशेष अभियान राबविणे सुरू केलंय. नागपूरमार्गे जाणाऱ्या सर्वच गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. अश्यातच विशाखपट्टणम दिल्ली एक्स्प्रेस (Delhi Express) नागपूर रेल्वे स्टेशनच्या (Railway Station) प्लॅटफॉर्म 1 वर थांबली होती. तिची तपासणी करताना काही लोक संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी तपासणी केली असता 8 बॅगेतून 108 किलो गांजा विशाखपट्टणमवरून दिल्लीला नेत असल्याचं आढळलं. पोलिसांनी 7 ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यात महिलांचा सुद्धा समावेश आहे. गांजा कुठून आला या टोळीचा सूत्रधार कोण आहे याचा तपास नागपूर रेल्वे पोलीस करत आहे. अशी माहिती आरपीएफ अधिकारी आर. एन. मीना (R. N. Meena) यांनी दिली.
वेगवेगळ्या डब्यांमधून तस्करी
रेल्वेमधून गांज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. विशाखपट्टणममधून दिल्लीमध्ये विक्रीसाठी छुप्या पद्धतीने गांजाची तस्करी केली जाते. यासाठी महिला आणि पुरुषांची टोळी सक्रिय आहे. रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्ब्यात बसून नियोजित पद्धतीने एका जागेवरून दुसऱ्या जागी ही तस्करी केली जाते. 108 किलो गांजासह 7 आरोपींना अटक करण्यात आली. या सुद्धा रेल्वेतून गांजा तस्करीचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या या तस्करांसाठी सुविधा जनक ठरत आहे का, असे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत.
गांजा तस्करीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या
गांजा तस्कर त्यांच्या तस्करीसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वापर करतात. विशाखापट्टणम येथून गांजा छुप्या पद्धतीनं रेल्वेत टाकला जातो. वेगवेगळ्या बोड्यांमधून हे आरोपी प्रवास करतात. त्यामुळं सहसा ही बाब लक्षात येत नाही. पण, नागपूर रेल्वे पोलिसांनी या आरोपींना अटक केली. हे वेगवेगळ्या डब्यांमधून प्रवास करत होते. महिला आणि पुरुषांचाही या टोळीत समावेश आहे. शंभर किलोच्या वर गांजा जप्त करण्यात आलाय. शिवाय सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, याव्यतिरिक्त फार मोठी टोळी यात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने रेल्वे पोलीस आता तपास करत आहेत.