मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? नागपूर पोलिसांची धावपळ
नागपूर शहरात स्फोटकांनी भरलेला एक ट्रक बेवारसरित्या आढळून आल्याने पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः भंबेरी उडाली (Truck loaded with explosives was found at Nagpur metro double-decker bridge).
नागपूर : नागपूर शहरात स्फोटकांनी भरलेला एक ट्रक बेवारसरित्या आढळून आल्याने पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः भंबेरी उडाली. हा ट्रक नव्याने तयार झालेल्या मेट्रोच्या डबलडेकर पुलावर उभा असल्याने घातपात घडवण्याचा कुणाचा हेतू तर नाही? अशी शंका सर्वांच्या डोक्यात आल्याने धाकधूक वाढू लागली होती. मात्र ट्रक नादुरुस्त झाल्याने ट्रक चालक मेकॅनिकला शोधण्यासाठी गेला असल्याचं कळल्याने पोलिसांच्या जीवात जीव आला. सुमारे चार तास चाललेल्या या थरार नाट्याने पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली (Truck loaded with explosives was found at Nagpur metro double-decker bridge).
पोलीस यंत्रणा अलर्ट
राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन डबल-डेकर मेट्रो पुलावर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक संशयास्पद स्थितीत उभा आहे, अशी माहिती कंट्रोल रूमला कळताच सर्वांची एकच धावपळ सुरू झाली. एक्सप्लोसिव्ह असं लिहिलेला ट्रक असल्याने पोलीस यंत्रणेला अलर्ट देण्यात आला. तोपर्यंत प्रताप नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ट्रकमध्ये कुणीही नव्हतं (Truck loaded with explosives was found at Nagpur metro double-decker bridge).
ड्रायव्हरचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने शंका-कुशंका
पोलिसांनी ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली. यामध्ये ट्रक चालकाचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. यावेळी पोलिसांनी ड्रायव्हरला संपर्क केला असता ट्रक ना दुरुस्त झाल्यामुळे मेकॅनिकच्या शोधत ट्रक सोडून बाहेर पडलो असल्याची माहिती चालकाने दिली. मात्र त्यानंतर लगेच त्याचा फोन बंद झाल्याने पुन्हा शंका-कुशंका वाढायला लागल्या होत्या. अखेर तो चालक आपल्या ट्रकजवळ आला तेव्हा पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी तो ट्रकला मेकॅनिकच्या मदतीने दुरुस्त करून घेतला आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात जमा केला.
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
स्फोटकांनी भरलेला ट्रक हैदराबाद येथून निघाला होता. त्यामध्ये खाणीत स्फोट घडवून आणण्यासाठी उपयोगात येणारे स्फोटके होती. मध्यप्रदेशच्या सिंगरोली आणि पश्चिम बंगाल येथील स्फोटके त्यामध्ये होती. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मात्र त्यामुळे मोठी खळबळ उडाली.
हेही वाचा :
रोडरोमिओंकडून पाठलाग, अश्लील हावभाव; धाकट्या बहिणीने भर रस्त्यात दिला चोप, व्हिडीओ व्हायरल
सीबीआयच्या रडारवर आता देशमुखांची दोन्ही मुलं? कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी होतेय?