Nagpur Bike Theft : कर्ज फेडण्यासाठी बाईक चोरायचा, मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

मध्य प्रदेशातून नागपुरात यायचा, नागपुरातील आपला साथीदार आकाश हिरणखेडे याला सोबत घ्यायचा आणि बाईक चोरी करायचा. चोरी केलेली बाईक सरळ मध्य प्रदेशात घेऊन जायचा, त्या ठिकाणी त्या बाईकचा नंबर बदलायचा आणि पैसे कमवायचा.

Nagpur Bike Theft : कर्ज फेडण्यासाठी बाईक चोरायचा, मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
नागपूरमध्ये बाईक चोराला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 6:07 PM

नागपूर : स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी मध्य प्रदेशातील तरुण नागपुरात येऊन बाईक(Bike) चोरायचा. त्या बाईक मध्य प्रदेशात नेऊन त्यांचे नंबर बदलायचा आणि विकायचा. मात्र त्याचा डाव फसला आणि तो सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागला. या चोरट्याने एक, दोन नव्हे तर चक्क 16 बाईक चोरी केल्या होत्या. सर्व बाईक आरोपीकडून हस्तगत (Seized) करण्यात आल्या आहेत. पुनीत गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार आकाश हिरणखेडे यालाही पोलिसांनी अटक (Arrest) केली. सीताबर्डी पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी आपलं कर्ज फेडण्यासाठी चोऱ्या करत असला तरी तो कुख्यात आरोपी झाला आहे. त्यामुळे त्याची रवानगी जेलमध्ये होणार हे नक्की.

कर्ज फेडण्यासाठी नागपुरातून बाईक चोरून मध्य प्रदेशात विकायचा

नागपूरचा सिताबर्डी हा मार्केट परिसर असून हा नियमित गजबजलेला असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क करून ठेवल्या जातात. याचाच फायदा मध्य प्रदेशातील पुनीत गायकवाड नावाच्या आरोपीने घेतला. त्याच्यावर कर्ज असल्याने ते कर्ज चुकविण्यासाठी त्याने चक्क बाईक चोरीला आपला व्यवसाय बनवला. मध्य प्रदेशातून नागपुरात यायचा, नागपुरातील आपला साथीदार आकाश हिरणखेडे याला सोबत घ्यायचा आणि बाईक चोरी करायचा. चोरी केलेली बाईक सरळ मध्य प्रदेशात घेऊन जायचा, त्या ठिकाणी त्या बाईकचा नंबर बदलायचा आणि पैसे कमवायचा. हा धंदा त्याचा चांगलाच चालला होता.

बाईक चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास केला

मात्र मार्केट परिसरातून बाईक चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी टेक्निकल बाबींचा सहारा घेत तपास केला. यावेळी पोलिसांना मध्य प्रदेशातील हा चोरटा ट्रेस झाला. मध्य प्रदेशात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. चोरट्याकडून एक दोन नाही तर चक्क 16 बाईक हस्तगत करण्यात आल्या.या सगळ्या बाईक त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून चोरल्या होत्या. चोरट्याकडे 16 बाईक आढळून आल्याने पोलीसही थक्क झाले. पोलिसांनी या चोराला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. (Two arrested for stealing bikes in Nagpur and selling them in Madhya Pradesh)

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.