Nagpur Police : दोन बाईक चोरटे जेरबंद, गाडीच्या मागणीनुसार करायचे चोरी, या जिल्ह्यात नेऊन विक्री
पोलिसांनी आरोपी विकाससोबत आणखी एकाला अटक केली. त्यांच्याकडून 13 वेगवेगळ्या कंपनीच्या बाईक जप्त केल्या आहेत. आरोपी चोरीच्या बाईकची विक्री हे व्हाट्स अॅपच्या माध्यमातून करत असल्याचं तपासात पुढं आलं. चोरीचा सुगावा लागू नये म्हणून आरोपी या गाड्या भंडारा जिल्ह्यातील साकोली भागात विक्री करत होते.
आशिया खंडातील सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न समिती कळमना मार्केट आहे. या कळमना मार्केट भागात गेल्या काही दिवसात सकाळच्या वेळी दुचाकी चोरी ( Bike Theft)जाण्याचे प्रमाण वाढले होते. कळमना पोलीस स्टेशनमधील डीबी पथकाने या भागात ट्रॅप लावला होता.चोरीच्या घटनाकडे लक्ष दिले. एक चोरीची गाडी परिसरातच पार्क केल्याचं लक्षात आले. पोलिसांनी पाळत ठेवली असता विकास बोपचे हा गाडी नेण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी(Police) खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.
नागपुरात चोरी, भंडाऱ्यात विक्री
पोलिसांनी आरोपी विकाससोबत आणखी एकाला अटक केली. त्यांच्याकडून 13 वेगवेगळ्या कंपनीच्या बाईक जप्त केल्या आहेत. आरोपी चोरीच्या बाईकची विक्री हे व्हाट्स अॅपच्या माध्यमातून करत असल्याचं तपासात पुढं आलं. चोरीचा सुगावा लागू नये म्हणून आरोपी या गाड्या भंडारा जिल्ह्यातील साकोली भागात विक्री करत होते.
दोघांना अटक, इतर रडारवर
कळमना पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात आणखी काही आरोपी आणि खुलासे होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. आता ही टोळी जेरबंद करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी पुढाकार घेतला आहे.
बाईक कुणाकुणाला विकल्या
या चोरट्यांचा हा धंदा चांगला जोरात चालला होता. मात्र आता यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी आणखी कोणाला या बाईक विकल्या, याचासुद्धा खुलासा होईल. त्यानंतर या बाईक चोरीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांची मागणी व्हाट्स अॅपवर घेत होते. त्या मागणीप्रमाणे दुचाकी चोरी करत होते. या टोळीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून 13 बाईक हस्तगत करण्यात आल्या. आता आणखी कुणाकुणाला या बाईक विकल्या याचा शोध पोलीस घेत आहेत.