Nagpur Crime : दोघे मित्र नेहमीप्रमाणे पान टपरीवर बसले होते, अचानक भररस्त्यात जे घडलं त्याने सर्वच हादरले !

नागपूरमध्ये गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. भररस्त्यात हल्ले, हत्या अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur Crime : दोघे मित्र नेहमीप्रमाणे पान टपरीवर बसले होते, अचानक भररस्त्यात जे घडलं त्याने सर्वच हादरले !
नागपूरमध्य़े दोघा तरुणांवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 3:15 PM

नागपूर / 17 ऑगस्ट 2023 : नागपूरमध्ये हत्यासत्र थांबता थांबेना. शहराच्या लगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. राजीवनगर जवळ दोन मित्रांवर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळते. राकेश मिश्रा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवी जयस्वाल असे जखमी तरुणाचे आहे. आरोपींची ओळख पटली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पान टपरीवर बसले होते अन्…

राकेश मिश्रा रवी जयस्वाल हे दोघे मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास राजीव नगर येथील पान टपरीवर बसले होते. त्याचवेळी कारमधून 7 ते 8 अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी आले आणि दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये राकेश मिश्राचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. राकेश आणि रवी दोघेही आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करायचे. ते दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे.

नेहमीप्रमाणे ते तिथे बसले असताना काही अंतरावर कारमधून 7 ते 8 तरुण उतरले. त्यांनी तोंडाला दुपटे बांधले होते. राकेश आणि रविच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरू केले. राकेश मिश्रा हे जखमी होऊन जागीच निपचित पडले तर रवी हा जीव वाचविण्यासाठी बाजूला असलेल्या महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये लपला. काचेचं कॅबिन हे आतून बंद केलं. परंतु आरोपी त्याचा पाठलाग करीत तिथे पोहचले. त्यांनी काचेच्या कॅबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरचं त्यालाही गंभीर जखमी केले. त्यानंतर सर्व आरोपी ज्या कारने आले होते. त्या कारमध्ये बसून पळून गेले.

हे सुद्धा वाचा

आरोपींची ओळख पटवण्यास यश

आरोपींची ओळख पटली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं. हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला? याबाबत अद्यार कळू शकले नाही. तपासाअंतीच हे स्पष्ट होईल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.