Wardha Accident : एसटी बसचं पुढचं चाक पुलाच्या बाहेर अधांतरी, 40 ते 45 प्रवाशांचा जीव टांगणीला! थरारक अपघात

जुलैमध्ये महाराष्ट्राची एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार, हा अपघात आठवतोय? आताही तसंच घडलंय! फक्त एक फरक या अपघातात होता.

Wardha Accident : एसटी बसचं पुढचं चाक पुलाच्या बाहेर अधांतरी, 40 ते 45 प्रवाशांचा जीव टांगणीला! थरारक अपघात
भीषण अपघात
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 12:52 PM

वर्धा : वर्ध्यात एसटी बसचा शुक्रवारी एक भीषण अपघात (Wardha Accident News) झाला. प्रवाशांनी खचाखच बसलेली बस अचानक एका पुलावर आली आणि या पुलाचा कठडा तोडून एसटी बसचं (ST Bus News) उजव्या बाजूचं पुढचं चाक पुलाच्या बाहेर आलं होतं. पुलावरच ही एसटी बस (ST Bus accident) अधांतरी लटकली होती. या अपघातामुळे बसमधील 40 ते 45 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. पण बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.

जुलै महिन्यात मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत महाराष्ट्राची एसटी बस कोसळली होती. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अगदी तशी दुर्घटना थोडक्यात होत होत राहिलीय. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी -वर्धा मार्गावरील येळाकेळी इथं घडली. एक अनियंत्रित झालेली एस बस नदीवरील पुलाच्या कठड्यावर अधांतरी अडकली बहोती. बस कठड्याला अडकल्याने पुलाखाली कोसळण्याची भीती होती. पण चालकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचलेत.

हे सुद्धा वाचा

चालकाने वेळी ब्रेक दाबत बसवर नियंत्रण मिळवं. त्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. बसचा वेग कमी होता. बस सावकाश पुढे जात होती, असंही सांगितलं जातंय. येळाकेळी इथं शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

शुक्रवारी संध्याकाळी वर्धी येथून आर्वीला जाण्यासाठी एसटी बस निघाली. एमएच 40 वाय 5297 या क्रमाकांची बस आर्वीला जात असताना येळाकेळी येथील पुलाजवळ पोहोचली. पण ही बस धाम नदीच्या पुलावर सुरक्षा कठड्याला धडकली होती.

या बसचं पुढचं एक चाक पुलावरुन पुढे सरकलं होतं. तीन चाकांवरच ही बस अधांतरी पुलावर लटकली होती. त्यामुळे प्रवाशांचा जीव कासावीस झाला होता. बस पुलावरुन खाली कोसळते की काय, अशी भीती प्रवाशांच्या मनात निर्माण झाली होती.

अखेर या बसमधील प्रवाशांना सुखरुप खाली उतरण्यात आलं. क्रेनच्या मदतीने बस पुलावरुन बाजूला काढण्यात आलं. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं. पण प्रवाशांच्या काळजाचा ठोका या अपघातामुळे चुकला होता. बसमधून खाली उतरल्यानंतर सर्वच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ही बस पुलावरुन क्रेनच्या मदतीने बाजूल करताना महामंडळाचे अधिकारी आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. वर्धा-आर्वी मार्गावरील वाहतुकीवर या अपघातामुळे काही काळ परिणाम जाणवला होता. दरम्यान, थोडक्यात निभावलं असलं तरी या अपघाताने सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.