Chandrapur Accident : जलाशयात सेल्फी काढायला गेले, पाय घसरून पडले, चारगाव सिंचन तलावात दोघांचा बुडून मृत्यू

हार्दीक गुळघाने याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पाय घसरून त्याचा तोल तलावात गेला. आयुष त्याला वाचविण्यासाठी धावला. पण, तलाव तुडूंब भरलेला होता. त्यामुळं दोघेही तलावात गटांगळ्या खाऊ लागले.

Chandrapur Accident : जलाशयात सेल्फी काढायला गेले, पाय घसरून पडले, चारगाव सिंचन तलावात दोघांचा बुडून मृत्यू
चारगाव सिंचन तलावात दोघांचा बुडून मृत्यू Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 8:52 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील (Varora-Chimur Marg) चारगाव सिंचन तलावात बुडून (Drowning) दोन मित्रांचा मृत्यू झालाय. विस्तीर्ण जलाशयासोबत सेल्फी काढताना हा प्रकार घडला. 5 मित्र तलावाशेजारी फिरण्यासाठी गेले होते. सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दीक गुळघाने (19) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडे (19) सरसावला. मात्र तोही पाण्यात पडल्याने इतरांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती पोलिसांना देताच स्थानिक मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह गवसले. 2 महिन्यात चारदा झालेल्या अतिवृष्टीमुळे चारगाव सिंचन तलावात मोठा जलसाठा आहे. शेगाव पोलीस (Shegaon Police) ठाण्याच्या चमूने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. या युवकांच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं

चारगाव येथे सिंचन तलाव आहे. यंदा भरपूर पाऊस पडल्यानं तलाव तुडूंब भरले. शेगाव येथील पाच मित्र तलावाशेजारी फिरण्यासाठी गेले. हार्दीक गुळघाने याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पाय घसरून त्याचा तोल तलावात गेला. आयुष त्याला वाचविण्यासाठी धावला. पण, तलाव तुडूंब भरलेला होता. त्यामुळं दोघेही तलावात गटांगळ्या खाऊ लागले. हे सर्व पाहू इतर सावध झाले. त्यांनी आरडाओरड केली. मासेमारी करणारे मदतीसाठी धावले. पण, तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. दोन तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. शेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. दोन तरुणांचा जीव नाहक सेल्फी काढण्याच्या मोहात गेला. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...