Nagpur Murder : नागपूरमध्ये पत्नीकडून पतीची हत्या, दारुचे व्यसन आणि भांडणाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल

मयत पती दररोज रात्री दारु पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. यामुळे पत्नी वैतागली होती. यातूनच बायकोने नवऱ्याचे शिलाई मशिनवर डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.

Nagpur Murder : नागपूरमध्ये पत्नीकडून पतीची हत्या, दारुचे व्यसन आणि भांडणाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल
नागपूरमध्ये पत्नीकडून पतीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 6:49 PM

नागपूर : दारूचे व्यसन आणि दररोजची भांडणे यामुळे कंटाळलेल्या पत्नीने डोक्यात रॉडने मारहाण करत पतीची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव महिलेने पोलिसांसमोर केला. मात्र पोस्टमार्टम अहवालानंतर महिलेचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक (Arrest) केले आहे. ग्यानी यादव असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर राणी यादव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशिनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव महिलेने रचला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केले आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाजपेयी नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून त्याला संपवले

मयत पती दररोज रात्री दारु पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. यामुळे पत्नी वैतागली होती. यातूनच बायकोने नवऱ्याचे शिलाई मशिनवर डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र शव विच्छेदन अहवालात मृताच्या डोक्याला मार आणि गळा आवळ्याचा खुणा आढळल्या. मात्र पत्नीचा बनाव फसला. मृतक ग्यानी यादव सोबत आरोपी राणीचे 18 वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र कुठलाही कामधंदा न करता दारू पिऊन येऊन ग्यानी घरी गोंधळ घालत होता. त्यामुळे मुलांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे राणीने रॉडने डोक्यावर वार करुन त्याची हत्या केली.

हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशिनवर डोकं आपटून आत्महत्या केल्याची माहिती परिसरात दिली. पोलिसांनी देखील त्याची नोंद घेतली. मात्र शव विच्छेदन अहवालात सत्य समोर आल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कलमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. पत्नी शिलाईचे काम करून घर चालवायची. मात्र ग्यानीच्या वागण्याने संतप्त झालेल्या राणीने नवऱ्याचा काटा तर काढला. पण आता वडील नाही आणि आई तुरुंगात गेल्यामुळे त्यांची मुलं मात्र उघड्यावर पडली आहेत. (Wife killed husband in Nagpur due to family dispute)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.