39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन आरोपीनेही महिलेवर बलात्कार केला (Yavatmal lady raped video shoot)

39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार
यवतमाळमध्ये महिलेवर दोघांचा बलात्कार
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 2:20 PM

यवतमाळ : 45 वर्षीय महिलेवर शेत शिवारात बलात्कार करुन आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ शूट केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. आरोपींनी हा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याची धक्कादायक माहितीही पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीतून पुढे आली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील डेहणी शेत शिवारात हा प्रकार घडला (Yavatmal 45 years old lady raped minor accuse threatens and rape after video shoot)

पाठलाग करुन शेतात बलात्कार

या गंभीर घटनेची फिर्याद पीडित महिलेने आर्णी पोलीस स्टेशनला दिली. त्यावरुन पोलीसांनी तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पीडित महिला 6 मे रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास डेहणी शेत शिवारातील एका शेतातून जात होती. त्यावेळी आरोपी अमोल प्रल्हाद आठवले (वय 39) याने पाठलाग करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार

घटनास्थळी हजर असलेले आरोपी आकीब खान वाजिद खान (वय 20) आणि 17 वर्षीय आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ अल्पवयीन आरोपीने पीडितेला दाखवला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही महिलेवर बलात्कार केला. तोंड उघडल्यास अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली.

त्यानंतर आरोपी आकीब खान वाजिद खानने 24 मे रोजी हा व्हिडीओ व्हायरल केला, असा आरोप पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अमोल प्रल्हाद आठवले याला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

पुण्यात वृद्धेची हत्या करुन अतिप्रसंग

पुणे जिल्ह्यात चाकण जवळील कुरकुंडी भागात वृद्धेची हत्या करुन अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार कालच उघडकीस आला होता. 71 वर्षीय महिला घरात एकटीच असताना 52 वर्षीय आरोपी अनिल वाघमारे तिच्या घरात घुसला. अनिलने वृद्धेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीच्या समोरील लोखंडी फुकारीने मारले. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. वृद्धा मृत्युमुखी पडल्यावर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला.

संबंधित बातम्या :

वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला उच्च न्यायालयात आव्हान

(Yavatmal 45 years old lady raped minor accuse threatens and rape after video shoot)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.